पाणथळीचे पक्षी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 January, 2017 - 01:57

खालील सर्व फोटो गुगल क्रोमवरच दिसतील

मागील आठवड्यात मायबोलीकर साधना, एशू बरोबर पाणजे येथील खाडीवर जाण्याचा योग आला. खर तर आमची जाण्याची वेळ संध्याकाळची असल्याने थोडक्यातच समाधान मानून यावे लागले कारण सूर्यनारायण मावळतीला निघाले होते. पण जो वेळ तिथे घालवला तो पक्षी दर्शनाने सार्थक झाला ह्याचे मनोमन समाधान लाभले.

काही पक्षांची नावे माहीत नाहीत ती जाणकार देतीलच.

१) चित्रबलाक - Painted Stork

२) भक्ष्याच्या दिशेने पाऊल.

३) मिळले

४) शेकाट्या/पाण्टिलवा/Black Winged Stilt
ह्याच्या टोकदार चोचीचा उपयोग करून हा गोगलगाय खडकांवरील कालव देखिल खाऊ शकतो.

५)

६) हे पाणबगळे जास्त असतात. नक्की नाव माहीत नाही.

७)

८)

९) खंड्या/ कॉमन किंगफिशर
हा आमच्यासाठी विशेष आकर्षण होता. कारण ह्या जातीतला खंड्या प्रथमच पाहीला.

१०) हे खंड्याबाळ असावे.

११) हिरवा तुतारी/Green Sandpiper

१२)

१३) चांदवा/Eurasian Coot

१४) Black headed gull
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

१५) पाठच्या पक्षांचे एकसाठ पिछे मुड

१६)

१७) आम्ही पक्षी पहात असताना एक फॉरेस्ट ऑफिसर आणि तिथला लोकल पक्शी प्रेमी असे दोघ जण एका पिशवीत पक्षी घेऊन आले. त्या पक्षाने काहीतरी खाऊन तो रक्ताच्या उलट्या करत होता. मग त्या स्थानिक मुलाने फॉरेस्ट ऑफिसरला कळवून त्याला ट्रीटमेंट दिली आणि दोघ त्याला आकाशी झेप घेण्यासाठी सोडायला आले होते व आमच्या समोरच त्याने भरारी घेतली.

१८)

१९)

२०)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फोटु दिसत नाहीयेत. Uhoh फक्त मलाच दिसत नाहीयेत का?
ओक्के ओक्के, क्रोममधे दिसतायत, फाफॉ मधे दिसत नव्हते. Happy

छान फोटो.
तुमच्या नावाचा वॉटरमार्क फोटोवर टाकणे अगदीच गरजेचं आहे का?
कृपया हा व्हिडीओ बघा https://www.youtube.com/watch?v=mLf58wZEhQ4
अर्थात तुमच्या मताचा आदर आहेच.

जागू, सुंदर फोटो.

फक्त वर एक सूचना लिही. " फोटो गुगल क्रोमवरच दिसतील" .:मी पण त्याला शरण गेल्यावरच दिसले.

चालेल शोभा.

टग्या - मी पूर्वी वॉटर मार्क न टाकता फोटो टाकायचे. पण नंतर आढळून आले की काही फेसबुक पेजेस वर माझे फोटो स्वतःच्या नावाने खपवून हजारो लाइक्स व कमेंट इतरांनी मिळवीले. आपण जेव्हा फोटो काढतो तेव्हा त्या काढताना काही भावना असतात. त्या फोटोची आणि आपल एक मानसीक पातळीवर नात निर्माण होत. शेवटी ती कला आहे. मग दुसर कोणी आपल नाव न टाकता त्याचा वापर केला की वाईट वाटत. तेव्हापासून मी वॉटरमार्क टाकायला लागले.

तुम्ही कृपया मी दिलेला ६ मिनीटांचा व्हिडीओ बघा.
अर्थात आधी नमुद केल्यानुसार तुमच्या मताचा आदर आहेच.

इंद्रा, नितीन धन्यवाद.

इंद्रा १४ आणि १६ चे नाव सांगितल्याबद्दल विशेष धन्यवाद.

वाह! सुंदर!!! तो चित्रबलाक अगदी फुलांच्या पाकळ्यांनी बनवलेला दिसतोय जागू! विश्वास बसत नाहीये, इतका सुंदर आहे तो पक्षी.

खुप छान प्रचि जागू...
सारेच पाणपक्षी अवतरले इथं..
अच्छा तर तो Water Pipit आहे तर.. मी किरण पुरंदरे अन डॉ राजू कसंबेंच पीडीएफ कोळून प्याले याच्या ओळखीकरीता.. अधिक ज्यांच्याप्रमाणे वाटले त्यांच्या फिमेल सुद्धा शोधल्या पण नाही मिळाला... तुला नाव कुठ मिळाल गं मग?
डॉ सलीम अलींच्या पुस्तकात का? मी तेवढच वाचायच बाकी ठेवलं कारण जवळ असलेल्यांपैकी..

छान आहे फोटोज

टग्या यांनी लिंक दिलेली बघितली।त्या वक्त्याने म्हणलेलं पीपल रिस्पेक्ट फ्रीडम हे मान्य आहे . बट आर वी इंडियन्स रियली लर्न टू रिस्पेक्ट द फ्रीडम ? त्या वक्त्याला जे अनुभव आलेत ते सर्व बाहेरच्या देशातले आहेत . ते लोक कॉपीराईटसबद्दल फार जागरूक असतात . त्यामुळे त्याला तसे अनुभव आले असावेत. जागूने लिहिलं तस दुसऱ्याचे असलेले फोटोज , पाकृ स्वतःच्या नावावर खपवणारे इथे खंडभर आहेत .

जागूने लिहिलं तस दुसऱ्याचे असलेले फोटोज , पाकृ स्वतःच्या नावावर खपवणारे इथे खंडभर आहेत .>> +१ जाई..
मागे तर शशांक पुरंदरे यांचा अख्खाच्या अख्खा लेख माबोवरुन ढापून दिव्य मराठी या प्रतिथयश दैनिकात एका बाईने स्वतःच्या नावावर खपवलेला दिसला मला...जिप्सीचे प्रचिसुद्धा बरेच दैनिक स्वतःच्या पेपरात खपवतात...

ह्या प्रचिंवरुन काल थोपूवर शुभदा पटवर्धन यांनी नेचर नट्स या ग्रुप वर शेअर केलेली एक बातमी आठवली...
ठाण्याजवळच्या खाडीत सद्ध्या जमलेल्या परदेशी पाहुणे असलेल्या रोहितांवर (Flemingo) कुणीतरी शिकारीकरीता गोळ्या झाडलेल्या आढळून आल्या... त्यात जखमी झालेल्या रोहितावर उपचार सुरु आहे.. काय पण साला विकृत लोक आहेत..श्या...

जागु छान. Happy

16 नंबरचा पक्षी वॉटर पिपीट नसुन Zitting Cisticola वाटतो आहे. Water Pipit भारतात दुर्मीळ आहे.

सही मस्त फोटोज आलेत .
व्हिडीओ पाहिला , क्न्सेप्ट चांगली आहे पण त्याने फोटोज स्वतःच्या वेबसाईटवर टाकले होते आणि त्याला जे चान्सेस मिळाले ते प्रत्येकालाच मिळतील असही नाही , किंवा तुम्ही जे चांगले फोटोज काढलेत त्याच श्रेय दुसरचं कोणीतरी उपटणार , मध्ये एका आयडीने काही जबरदस्त फोटोज आपल्या नावावर खपवले होते, पण काही जागरुक माबोकरांमुळे त्याची लुच्चेगिरी उघडकिला आली.

मस्त फोटु, जागू.

खंडूळं भारी (फोटो १०).

फोटो १८ मध्ये बगळ्यासोबत छोटा पक्षी आहे, ते बगळुलं आहे का? त्याचे पंख नंतर पांढरे होतात का?
मला बगळे आवडतात. कडक ऊन असावे, गवत वाढलेल्या ओढ्याच्या काठावर पाण्यात पाय सोडून बसलेले असावे आणि पुढ्यातल्या प्रवाहाच्या खळखळ आवाजासोबत शुभ्र बगळे आपल्या मानेला नाजूक वळणे देत मासेमारी करायला ओढ्यात रेंगाळत असावेत.

सुलक्षणा, दिनेशदा, मनिमोहोर, टिना, जाई, कंसराज, कांदेपोहे, गजानन, श्री, चैत्राली धन्यवाद.

केपी धन्यवाद नावांसाठी.

16 नंबरचा पक्षी वॉटर पिपीट नसुन Zitting Cisticola वाटतो आहे. Water Pipit भारतात दुर्मीळ आहे.>> कांदापोहे.. त्यापक्ष्याच्या चोचीचा रंग अन् पायाच्या रंगावरुन तो मलातरी Water Pipit च वाटतोय..

त्यापक्ष्याच्या चोचीचा रंग अन् पायाच्या रंगावरुन तो मलातरी Water Pipit च वाटतोय..>> Zitting cha chance jasti ahe.. karan water pipit cha mi tari kahi varshatale record vachale nahi.. jagu tujhyakade anakhi detail photo aahe ka. water pipit asalyas tujhya navavar record hoil khara tar. BIRD ID var takun baghayala hava.

water pipit asalyas tujhya navavar record hoil khara tar. >> झाला तर छानच आहे..पण तुम्ही एकदा बघाच या दोन पक्षांचे डिटेलिंग.. वॉटर पिपिट चे चान्सेस जास्त वाटताहे मला...

water pipit asalyas tujhya navavar record hoil khara tar. >> झाला तर छानच आहे..पण तुम्ही एकदा बघाच या दोन पक्षांचे डिटेलिंग.. वॉटर पिपिट चे चान्सेस जास्त वाटताहे मला...>>
common bushchat female आहे.

मी ते नावच काढते. म्हणजे कोणाची गफलत नको व्हायला. मी परत पाणज्यात गेले की हा पक्षी दिसला तर अजुन क्लियर फोटो घेण्याचा प्रयत्न करेन. मग आपण नाव शोधू.

Pages