मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

तुम्हाला या पानावर उजवीकडे तुमच्या सदस्यनामाखाली माझे सदस्यत्व दिसतेय का ? त्यावर क्लिक करा.

किंवा तुम्ही मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर असाल तर त्या पानावरही उजवीकडे तुम्हाला विचारपूस असल्यास तिथेच कंसात आकडा दिसेल.

आता मुख्यपृष्ठावर जाऊन पहा. मी तुमची विचारपूस केलीय.

फोटो आपलोड न करता दुसऱ्या साईटवरचा फोटोची लिंक वापरुन फोटो टाकु शकतो का? जर तसे आसल्यास कसा फोटो टाकावा व फोटोे दिसतो का की फक्त फोटोची लिंकच दिसते??

"हे पण पहा" मधे कोणते धागे दाखवले जातात ?
(ऋन्मेष च्या अर्थक्रांती धाग्याच्या उजव्या कोप-यात हे धागे दिसतात. प्रत्येक वेळी दिसेलच असं नाही).

he pan paha.jpg

मला मायबोली वर नविन काही लिहायचे असल्यास कसे लिहीता येईल नविन लेखनवर टिचकी मारल्यास दुसरेच पान येत आहे तरी मी नवीन लेखन (कविता प्रकार ) कसे करावे याबद्दल कुणी माहीती सांगितल्यास मी त्यांचा ऋणी राहील.......

शब्दाच्या अखेरीस येणारे पाय मोडके अक्षर कसे लिहायचे? अर्धा म, अर्धा त वगैरे? जसे कुर्यात मधला त

जसे " सल्ला " या शब्दातला " ल् "

मी गूगल क्रोम व विंडो १० वापरतो. पूर्वी अक्षर व shift or cntrl H असे काहीतरी लिहीले की जमत असे.

सपना : कॅश आणि कुकीज क्लीअर करून बघितल्यावर तुम्हाला नवीन फोटो दिसला पाहिजे.

कैवल्य सिंह : कृपया या पानावरील फोटोविषयक चर्चा वाचणार का ?

सपना : 'हे पण पहा' बद्दल या पानावर जास्तीची माहिती आहे.

santosh bhosale : कृपया मदतपुस्तिकेतल्या : लेखनासंबंधी प्रश्नोत्तरे विभागातले हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा? हे पान बघणार का ?

नंद्या४३ : जोडाक्षर द्यायचे आणि बॅकस्पेस वापरून खोडायचे उदा.

कुर्यात् लिहीताना कुर्यात्म लिहायचे, आणि मग बॅकस्पेस वापरून म् उडवायचा, शेवटचा.

@ नंद्या, कुर्यात् लिहीताना कुर्यात्म लिहायचे, आणि मग बॅकस्पेस वापरून म् उडवायचा, शेवटचा.>>> 'कुर्यात्' च्या प्रकारे लिहिताना अजून एक अडचण होते. ती पुढीलप्रमाणे.

समजा आपल्याला 'ट्रॅव्हल्स् च्या बसने' असं लिहायचंय तर आपण 'ट्रॅव्हल्स्' आणि 'च्या' एकत्र जोडला तर शब्द तयार होतो 'ट्रॅव्हल्स्च्या बसने'. खरं म्हणजे मोडलेल्या पायाच्या 'स्' सहित तो 'च्या' ला जोडला जायला हवा होता. ह्यावर काही उपाय आहे का?

तेव्हा ट्रॅव्हल्स आणि च्या असं वेगवेगळं लिहा आणि मग "च्या"च्या आधी बॅक्स्पेस मारून दोन्ही शब्द चिकटवून टाका. हाकानाका.

'ट्रॅव्हल्स्' + 'च्या' = 'ट्रॅव्हल्स् च्या' ?????????

'ट्रॅव्हल्स्' + 'च्या' = 'ट्रॅव्हल्स्च्या' ?????????

'ट्रॅव्हल्स्' + 'च्या' = 'ट्रॅव्हल्स्'च्या' ?????????

जबरदस्ती इंग्रजी शब्द मराठीत घुसडायचे नि त्याला मराठी व्याकरणात बसवण्याचे नि ते कसे लिहायचे याची चर्चा!!
सरळ Travels लिहा.
Happy

@ नन्द्या४३, जबरदस्ती इंग्रजी शब्द मराठीत घुसडायचे नि त्याला मराठी व्याकरणात बसवण्याचे नि ते कसे लिहायचे याची चर्चा!!
सरळ Travels लिहा.
>>> आपला मुद्दा पटला, तसदीबद्दल क्षमस्व.

वृंदा : कृपया नवीन लेखनासंबंधी : मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे?
हे मदतपुस्तिकेतले , लेखनासंबंधी प्रश्न विभागातले सदर बघणार का ?

सपना कृपया मदतपुस्तिकेतला, मायबोलीसंबंधी प्रश्नोत्तरे विभाग बघणार का ?

त्यात : मायबोलीवर नेमकी कुठली वेळ दिसते? येथे तुम्हाला उत्तर सापडेल.

अजून काही प्रश्न असतील तर कृपया येथेच विचारा.

नमस्कार ,
मी नवीनच आहे यामध्ये ,माझ लिखान कस पोष्ट कराव
या बद्दल मला काहीच माहीत नाही.
कृपया माहीती सांगा.

नवीन मायबोली सतत crash होत आहे. IE and Chrome try केले >>
+१११

मला फायरफॉक्स वर इस्शू नाही येतेय पण IE वर वैताग आलाय नुसता... क्रोमच्या मी नादी लागत नाही .. तो बाबा सगळ्या पोस्टी बिघडवतो

हा प्रश्न २४ तासात सुटला नाही तर कृपया पुन्हा लिहा. काही मायबोलीकरांना ही अडचण येते आहे पण त्याचे उत्तर अजून सापडले नाही. काही तासांनंतर तो आपोआप सुटतोय असा अनुभव आहे.

Pages