पाव किलो हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी लाल मोहरी
एक टीस्पून हळद
दोन टीस्पून कच्चा हिंग
तीन ते चार टीस्पून मीठ
अर्धा टीस्पून मेथीदाणे
पाच-सहा लिंबांचा रस
एक टीस्पून तेल
मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत. त्यात मीठ, हळद व एक टीस्पून हिंग घालावा. हे मिश्रण नीट एकत्र करून ठेवावे.
एक चमचा तेलात मेथीदाणे तळून घ्यावेत. हे तळलेले मेथीदाणे मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत. थोडा लिंबाचा रस घालून लाल मोहरी बारीक वाटून घ्यावी. मेथ्या आणि फेसलेल्या मोहरीची पूड मिश्रणात मिसळावी.
उरलेल्या तेलात एक टीस्पून हिंग तळून घ्यावा व तोही मिसळावा. वरून उरलेला लिंबांचा रस घालावा.
हे सर्व मिश्रण पुन्हा नीट एकत्र करून बाटलीत भरून ठेवावे.
वरून (हवी असल्यास) फोडणी थंड करून घालावी.
काळी मोहरी वापरल्यास 'ती' चव येणार नाही. कडू व्हायची शक्यता जास्त.
लाल मोहरी घेतांनाच एखादा दाणा चावून बघावा. तो तिखट लागला तर ती मोहरी वाटल्यावर चांगली चढते. (सुट्टी मोहरी मिळत नसेल तिथे हे जमणार नाही. पण भारतात जमेल.)
चवीनुसार लिंबू,मीठ याचे प्रमाण बदलावे.
लिंबूरसाऐवजी कैरीचा कीसही चांगला लागतो.
जल्लां ही माझ्या आधी नंबर
जल्लां ही माझ्या आधी नंबर लावायची काय भान्गड आहे????
लालू आणि सीमा, तुम्ही उखाणा घेऊन टाका:
............................................
काकडीचं रायतं करते माझा नंबर पयला
लालू, फोटो मस्त आला आहे. पण तू लामो घातलीस की कामो ते सांग...
घे मी पुर्ण करते काकडीचं
घे मी पुर्ण करते
काकडीचं रायतं करते माझा नंबर पयला
--राव बसले मिरची लोणचे खायला
देवा.... हे सगळे वाचुन इतके
देवा.... हे सगळे वाचुन इतके तोंडातुन इतकी लाळ गळेल असे आधीच कळले असते तर मी इथे आलेच नसते....
मला वाटलं मोहरी कशी काय फसेल?
मला वाटलं मोहरी कशी काय फसेल? :प
मी लाल मोहरीच वापरली.
मी लाल मोहरीच वापरली.
स्वाती, तुझ्या या कृतीने मी
स्वाती, तुझ्या या कृतीने मी केलेले लोणचे -
खल्लास फोटो आहेत एकेकीचे!
खल्लास फोटो आहेत एकेकीचे!
धन्यवाद.
रेसिपी तुम्हांला आवडल्याचं आईला कळवते.
मस्त फोटो आहे.. इंगो मध्ये
मस्त फोटो आहे..:)
इंगो मध्ये लाल मोहरी मिळेल का?
मी_पल्लवी, मिळेलच याची खात्री
मी_पल्लवी, मिळेलच याची खात्री नाही. सहसा मोठा दाणा असलेली काळी मोहरी मिळते इथे तरी.
लाल क्वचित नशीबाने मिळाली तर. माझ्याकडे भारतातून आणलेलीच आहे थोडी.
पण वर मृण्मयीने काळी मोहरी वापरूनही लोणचं चांगलं झाल्याचं लिहिलंय, तेव्हा प्रयोग करायला हरकत नाही.
Ok स्वाती..करून बघेन ..
Ok स्वाती..करून बघेन ..
तीन इंग्रो शोधून झाले, लाल
तीन इंग्रो शोधून झाले, लाल मोहरी मिळत नाही. घरी भारतातून आणलेली बारीक काळी मोहरी आहे . तीच घालून करून पहावे आता .
अचूक किनार्यावर लामो मिळते
अचूक किनार्यावर लामो मिळते कालच केलय हे लोणचं मस्तच
बाई धन्यवाद
मला एडिसनला मिळेल असं वाटतंय.
मला एडिसनला मिळेल असं वाटतंय. जाऊन बघेनच आता.
मीही आज केले.. माझ्याकडची
मीही आज केले.. माझ्याकडची मोहरी बहुतेक काळीच आहे..
छान झाले आहे एकदम!! फोटो नंतर टाकीन..
पहिल्यांदाच असं लोणचे वगैरे केले... मजा आली!
काळ्यामोहरीच लोणाचं छानच
काळ्यामोहरीच लोणाचं छानच होतं. उगाच लालमोहरीचा हाइप आहे!
मृण्मयी, तुमच्या तिकडे लाल
मृण्मयी, तुमच्या तिकडे लाल मोहरी काळ्या रंगाची मिळत असेल
(एकदा मी कामो घालून काकडीचं रायतं केलं होतं तर अगदी कडूजार झालं होतं लामो सहज मिळत असतानाही कामो का घातली होती? ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'आपली आवड')
स्वाती आज हे लोणच केल खुप छान
स्वाती आज हे लोणच केल खुप छान झाल आहे.
पाककृती बद्द्ल धन्यवाद.
लोणचे केले परवा. चांगले झणकले
लोणचे केले परवा. चांगले झणकले नाकात !! आवडेश एकदम!
धन्यवाद स्वाती. मी मध्यंतरी
धन्यवाद स्वाती.
मी मध्यंतरी केले हे लोणचे. छान झाले.
मी पण केले हे लोणचे . मस्त
मी पण केले हे लोणचे . मस्त झाले . जबरी तिखट आहे पण मजा येते. पहिल्या दिवशी जरा कडवट वाटत होते पण दोन दिवसांनी एक्स्पेक्टेड चव आली. धन्यवाद स्वाती.
लाल मोहरी नव्हती म्हणून पिवळी
लाल मोहरी नव्हती म्हणून पिवळी मोहरी घातली. मस्त झालेय चवीला.
बाई, रेस्पी एकदम भारी आहे. धन्यवाद.
फेसलेली म्हणजे काय? वाटलेली
फेसलेली म्हणजे काय? वाटलेली मोहरी का?
खुपच छान!
खुपच छान!
पेशल तिखट मिरच्या आणून लोणचं
पेशल तिखट मिरच्या आणून लोणचं घालण्यात आलेलं आहे. मव्हरी जी होती तीच घेतलीय. मिक्सर मध्ये चांगली फेसलीय. बायडी लोणचं ठेवलेल्या पातेल्यापासून दूर झाली झिनझीण्यांमुळे... फार फार टेस्टी झालेलं आहे. धन्यवाद पाकृ दिल्याबद्दल. हा फोटू...
सुप्प्प्प्प्प्प्प्पर्र्र
सुप्प्प्प्प्प्प्प्पर्र्र
तोंपासु!!!
तोंपासु!!!
वाह वाह.. काय फोटो आहे..
वाह वाह.. काय फोटो आहे...करून बघायलाच हवं आता..
रच्याकने, याच लोणच्यात मुळा
रच्याकने, याच लोणच्यात मुळा मिरच्यांच्या साईज मध्ये कापून मीठ लावून पाणी काढून, कोरडा करून मग यात वापरला तर? सध्या लय फ्रेस मुळे आहेत मार्केटात म्हणून सुचलं...
एकदम लिथल काँबो होईल का? मुख्य म्हणजे टिकेल का?
नो आयडिया. माहितीच्या
नो आयडिया. माहितीच्या स्त्रोताला विचारून सांगते.
फेसलेलि मोहरी म्ह णजे काय
फेसलेलि मोहरी म्ह णजे काय please explain
Pages