'मोर देखने जंगल में' - संपूर्ण चित्रपट

Submitted by admin on 8 September, 2016 - 00:26

भारतातल्या ग्रामीण भागात राहणार्‍यांना रोजगार मिळावा, त्यांना स्वयंपूर्ण होता यावं, या हेतूनं डॉ. मणिभाई देसाई यांनी 'बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केली. आज ही संस्था शेती, नैसर्गिक संपत्तीचं व्यवस्थापन, पशुधनाचं व्यवस्थापन आणि संवर्धन, जलव्यवस्थापन अशा अनेक पर्यायांच्या मदतीनं रोजगार-निर्मिती करते.

'बायफ' भारतातल्या सोळा राज्यांमध्ये कार्यरत असून सुमारे एक लाख खेड्यांमधल्या पन्नास लाखांहून अधिक भूमिहीन आणि परिघाबाहेर जगणार्‍या कुटुंबांना या संस्थेनं मदतीचा हात दिला आहे.

सुशिक्षित तरुणांनी सामाजिक संस्थांशी स्वतःला बांधून घ्यावं, आपल्या आवडीनिवडींचा, व्यावसायिक ज्ञानाचा उपयोग करून सामाजिक चळवळींमध्ये सामील व्हावं, असं 'बायफ'ला वाटतं आणि त्यातूनच 'मोर देखने जंगल में' या चित्रपटाची निर्मिती या संस्थेनं केली. 'बायफ'चं ग्रामीण भागातलं, त्यातही आदिवासी-बहुल क्षेत्रातलं महत्त्वाचं काम, तिथे संस्थेनं यशस्वीरीत्या राबवलेले प्रयोग, त्यातून तयार झालेली प्रारूपं लोकांपर्यंत पोहोचावीत, त्यांना संस्थेच्या कामाची माहिती व्हावी, हादेखील हा चित्रपट तयार करण्यामागे एक उद्देश होता.

'मोर देखने जंगल में'चं दिग्दर्शन सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी केलं असून सारंग साठ्ये, राधिका आपटे, देविका दफ्तरदार, ओंकार गोवर्धन, सुनील सुकथनकर, डॉ. शेखर कुलकर्णी, मदन देवधर, अश्विनी गिरी, सेवा चौहान, श्रीकांत यादव, सागर देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत.

यंदाच्या गणेशोत्सवात सादर करत आहोत - बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन निर्मित, सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर दिग्दर्शित मोर देखने जंगल में.

***

मोर देखने जंगल में

निर्मिती - बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन
दिग्दर्शन - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर
कथा, पटकथा, संवाद - सुमित्रा भावे
छायालेखन - मिलिंद जोग
कलादिग्दर्शन - सुमित्रा भावे, संतोष संखद
संगीत - शैलेंद्र बर्वे
गीत - सुनील सुकथनकर
संकलन - मोहित टाकळकर
ध्वनिलेखन - अनमोल भावे
वेशभूषा - सुमित्रा भावे

कलाकार - सारंग साठ्ये, राधिका आपटे, देविका दफ्तरदार, ओंकार गोवर्धन, सुनील सुकथनकर, डॉ. शेखर कुलकर्णी, मदन देवधर, अश्विनी गिरी, सेवा चौहान, श्रीकांत यादव, सागर देशमुख

***

या चित्रपटाचे सर्व हक्क बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन यांच्याकडे राखीव आहेत. हा चित्रपट प्रताधिकारधारकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही माध्यमाद्वारे इतरत्र प्रसारित करण्यास मनाई आहे.

हा चित्रपट मायबोली.कॉमवर प्रसारित करण्यास परवानगी दिल्याबद्दल बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन व सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर (विचित्र निर्मिती, पुणे) यांचे मन:पूर्वक आभार.

हा चित्रपट मायबोली.कॉमवर प्रसारित करण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन, श्रीमती सुमित्रा भावे - श्री. सुनील सुकथनकर, श्री. सोहनी व श्रीमती मीना गोखले यांचे आभार.

***

mor dekhne.jpg

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! येत्या रविवारी पाहणार.

धन्यवाद बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन आणि प्रशासक.

मस्तं!
आमच्या गावात गणेशोत्सवात एक रात्र तरी व्हिडिओवर सिनेमा लागायचा आणि आम्ही चटया, गोणपाटं घेऊन बघायला जायचो त्याची आठवण झाली

गणेशोत्सवानिमित्त महत्त्वाचा सामाजिक संदेश देणारा सिनेमा दाखवायची कल्पना अतिशय आवडलेली आहे.

आत्ताच पाहिला. कथावस्तु, तळमळ,उत्कटता अनुभवली. ह्या कार्यकर्त्यांसमोर आपण किती थिटे आहोंत.! ह्याची जाणीव झाली.

अरे वा, मस्त कल्पना हा सिनेमा इथे प्रसारीत करण्याची. अश्विनी गिरी माझी अत्यंत आवडती अभिनेत्री, तिचा अभिनय बघायला मिळेल हा अजून एक बोनस.

व्वाह !
पहायलाच हवा हा सिनेमा. सगळी नावं तगडी आहेत. बायफचे नाव ऐकून होते. कामाबद्दल इतके तपशील आज पहिल्यांदा कळाले. ( इतके दिवस मायबोलीचे मुखपृष्ठ पाहतेय पण लक्ष कसे गेले नाही ? Sad )