मायबोली मास्टरशेफ - मंजूताई- बलम बॉल्स विद चीज

Submitted by मंजूताई on 13 September, 2016 - 22:14

ब : बटाटा (उकडलेले)
ल : लाह्या (साळीच्या/धानाच्या)
म : मूग (मोडवलेले)
धणे, मिरे, बडीशोप, लाल मिरची भाजून केलेली ओबडधोबड पूड, चीज क्युब्ज ,मीठ, चाट मसाला, तळण्याकरिता/शेलोफ्राय करायला तेल.
कृती : मूग कढईत पाच मिनीटे वाफवून घ्यावे. लाह्या पाण्यात टाकून लगेच रोळीत काढून ठेवाव्या. बटाटा कुस्करुन घ्यावा. मूग बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात चीज सोडून सगळे जिन्नस नीट एकत्र करुन घ्यावे. पारी करुन त्यात चीज क्युब ठेवून बॉल बनवावा. तळावा किंवा आप्पे पात्रात शेलो फ्राय करावा . फोटोत दाखवलेल्या प्रमाणात जिन्नस घेतल्यास दहा बॉल्स होतात.
टीपा: स्टार्टर म्हणून चालेल. भरण्याकरिता विविध पर्याय अंड, पनीर, चिकन ... मुगाच्या ऐवजी इतर कुठलही कडधान्य किंवा मिक्सही वापरता येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाह्या.. ईंटरेस्टींग!
माबोवर कम्पेअर ऑप्शन हवा होता. या बलम बॉल्स आणि त्या येडा बटाटाला कम्पेअर करून कश्यात पोषकतत्वे कमीजास्त आहेत हे चेक करून काय खायचे याचा निर्णय घेता आला असता. Happy

सगळ्यांना धन्यवाद! खूप हेल्दी व सोपी व झटपट होणारी पाकृ आहे. साळीच्या/धानाच्या लाह्या हे बाईडिंग साठी कॉनस्टार्च ला हेल्दी पर्याय आहे . करुन, खाऊन पहा आणि मगच मत द्या.

मस्त !