संगीतक हे नवे-कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद

Submitted by आशिका on 14 September, 2016 - 03:18

कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद

बॉस म्हणजे बॉस म्हणजे बॉस असतो
कधीही, कसाही वागला तरी नेहमी 'राईटच' असतो

क्वचित उशीर होताच चार -चार फोन करतो
वेळेत पोहोचते तेव्हा याचा पत्ताच नसतो

कंपनीची भिस्त सारी याच्यावरच आहे
मालकासही नाही इतकी काळजी याला आहे

डोक्यावरचे, हाताखालचे सगळेच मेले कामचुकार
एकटा जीव खपत असतो, याच्यावरच सारी मदार

ऐकवतो नेहमी, "माझ्या सुट्ट्या जातात वाया
विकेंडालाही नेहमीच मी तयार रिपोर्ट द्याया

काय करु? कसे करु? वेळ मला पुरत नाही"
"नका घाबरु सर तुम्ही, काम सारे संपवले आम्ही"

खूश होत म्हणते स्वारी, "उद्या आहे प्रेझेंटेशन
झक्कास बनव स्लाईड्स तू, पडले पाहिजे इंप्रेशन

बॅक अप फाईल्स ठेव रेडी हार्डडिस्कमध्ये
अडले जर घोडे माझे, तर कर सार्‍या पुढे"

गेले परवा मागायला गणपतीसाठी सुट्टी
ऐकून माझे म्हणणे, विचाराधीन 'उत्सवमूर्ती'

म्हणे मला, "घरी तुझ्या सण आहे खासा
गरजच आहे तुला आता घेण्याची रजा

जा खुशाल मात्र, मोबाईल ठेव सुरु
घेऊन जा तो लॅपटॉप, इथे नको विसरु

क्वचित मी करेन फोन, जर इमरजंसी येईल
ई-मेल कर तू मग रिपोर्ट बनवून फाईल"

एका हाती तबक आरतीचे, लॅपटॉप दुसर्‍या हाती
नाचवत मी केली घरी, गणेशाची आरती

हक्काची सुट्टी स्वारींची मात्र, तीन आठवड्यांची खाशी
क्लब महिंद्राची मेंबरशिप फुकट घालवेल कशी?

नेटवर्क कध्धीच नसते त्या महिंद्राच्या रिसॉर्टात
इच्छा असूनही मग राहता येत नाही संपर्कात

प्रत्येक कार्यालयी हमखास मिळेल ही 'विशिष्ट जमात'
बॉस नामक 'गुणी कर्मचारी' नाही त्याची ददात

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!

मस्त आहे.
जा खुशाल मात्र, मोबाईल ठेव सुरु
घेऊन जा तो लॅपटॉप, इथे नको विसरु> हे तर असतंच असंत

अरे हा विषय आला कधी आणि तुम्ही लिहीलं कधी.. असं पटपट कस जमतं.. भारी आहात.. घरातल्या घरात साधे बोलतानाही गुणगुणत पद्यातच बोलतात का Wink

प्रत्येकजण रीलेट होणार नक्कीच >>> हो, कारण प्रत्येकाला एक बॉस असतो, अगदी बॉसलाही एक बॉस असतो, आणि ज्याला तो ही नसतो त्याला गर्लफ्रेंड किंवा बायको असतेच Wink

सही