(डोंबिवलीतल्या टिळक पुतळ्यापाशी टिळक, कल्याणकर अशा मला भेटतात, तेव्हाचा हा आमचा संवाद)
टिळक : तुझ्या गावी आलो होतो, शतकापुर्वी मी जेव्हा
गणपती उत्सवाचा, रुजला कोंब तेव्हा
मी : पाहीलाय तुमचा "तो" फोटो मी व्हॉटस अॅपच्या द्वारी
प्राऊड फीलही केलेय मी ही केव्हढे तरी
(मित्रांनो आहे यालाही पार्श्वभुमी,
नंबर द्या पाठवतो,छबी व्हॉटस अॅप वरुनी)
टिळकः बाळा, ये तू माझ्या, समोरी तू ऐसा
गणेशोत्सव चाले, अता सांग कैसा?
मी: तेव्हा रुजला कोंब, त्याचा वटवृक्ष झालाय
गल्ली बोळात पारंब्यांनी ट्रॅफीक जॅम केलाय
टिळकः काय सांगतोस? इतका पॉप्युलर हा झालाय?
मी: पॉप्युलर? नाही हो. आता धंदाच बोकाळलाय
(ऐकून झाले टिळक उदास
म्हणे, यासाठी का घेतला ध्यास?)
मी: नका होऊ असे उदास
सैर घडवतो तुम्हा खास
बघून तिथला उत्सव भारी
जाईल पळून निराशा सारी
टिळकः चल घेऊन मला सत्वरी
बघूदे तुझा तो उत्सव तरी
मी: कशाला कुठे जायला हवे
आयपॅडवरच दिसेल की रुपडे नवे
(उघडला आयपॅड, टाईप केला कोड
मायबोलीवर उघडला गणेशोत्सवाचा नोड
सतरा वर्षांचे उपक्रम दाखवले
तेव्हा कूठे चेहर्यावर पुन्हा हसू उगवले)
(म्हणाले "धन्यवाद! आता कसे बरे वाटले
जीवास माझ्या तृप्त वाटले"
मी म्हंटल, "चला इथे, ऐकवतो एक गंमत खाशी
इथे जे ऐकाल ते आहे एकदम बावनकशी"
(मित्रहो, टिळक तर ते ऐकून नॉस्टाल्जीक झाले
धन्यवाद म्हणून, आशिर्वादही देऊन गेले)
मस्त लिहीलेय.
मस्त लिहीलेय.
संयोजक, एक स्वल्पविराम आणि एक
संयोजक, एक स्वल्पविराम आणि एक शब्द टायपो झालेला तो तेव्हढा दुरुस्त केलाय
उघडला आयपॅड, टाईप केला
उघडला आयपॅड, टाईप केला कोड
मायबोलीवर उघडला गणेशोत्सवाचा नोड>> खासच!!
मज्जा आली वाचायला..
चांगलं लिहिलेय
चांगलं लिहिलेय
छानच. स्थळ परिचयाचे असल्याने
छानच. स्थळ परिचयाचे असल्याने डोळ्यासमोर उभा राहिला प्रसंग.
मस्त! एकदम खास!
मस्त! एकदम खास!
छान कल्पनाविस्तार !
छान कल्पनाविस्तार !
मस्त!
मस्त!
मस्तय हे.
मस्तय हे.
मस्तच कल्पना !
मस्तच कल्पना !
छानच!
छानच!
छोटंस पण मस्त लिहिलं आहेस
छोटंस पण मस्त लिहिलं आहेस कवे!
मस्तंय.
मस्तंय.
उघडला आयपॅड, टाईप केला
उघडला आयपॅड, टाईप केला कोड
मायबोलीवर उघडला गणेशोत्सवाचा नोड >> मस्तच! सुंदर झालंय.