नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथेच टाका तंबू बघायचा विचार करतेय पण मला रिपीट बघायला लागेल. कारण त्यावेळी अशोका असतं. नवरा बघतो ती.

हि सिरीयल शशांक, माझी भाची माधवी आणि माझ्या बहिणीच्या सोसायटीत राहते स्वरांगी साने हि बालकलाकार ह्यांच्यासाठी बघायची आहे.

फ्रेशर्स संजय जाधवची आहे त्यामुळे दुनियादारी प्रभाव असेल बहुतेक.

लव लग्न लोचा पण बघायचं मनात आहे.

बघूया आमच्याकडे हे channel दिसतं का, ते पहिलं.

ह्या चॅनेलच्या नावाप्रमाणे खरंच मालिका दिदोदु स्टाईल असतील तर हे चॅनल झी मराठीला सुद्धा मागे टाकु शकेल.

फ्रेशर्समध्ये दोन मुली, एक मुलगा जरा फ्रेश वाटल्या बाकी सगळे मोठेच वाटतायेत. ती रश्मी अनपट तर असावा सुंदर मध्ये होती.

हा आता पोस्ट डिग्री कॉलेज दाखवतील तर वाटतायेत त्या वयाचे. अर्थात दुनियादारी मुविमध्ये तर स्वप्नील, अंकुश होते त्यांच्यापेक्षा नक्कीच लहान आहेत सर्व Lol .

हो वेल. तिने मला मागेच फोटो पाठवले.

हो आणि तिचं काम खटकलं किंवा आवडलं नाही तर बिनधास्त लिहा इथे. मी वाचते वगैरे काळजी करु नका.

रच्याकने - इटातं चे डायलॉग्ज माझा भाऊ लिहितोय. पण डायलॉग्जला कोणी नावं ठेवली तर मी बिलकुल काही बोलणार नाही.. वापरा आपलं फ्रीडम आणि काढा पिसं .... (तुम्ही जे लिहाल ते सगळं जाऊन सांगणार त्याला. भावाच्या चुका काढण्याचा त्याला पिड्ण्याचा इतका चांगला चान्स का सोडा.. Wink )

<<.. त्याला पिड्ण्याचा इतका चांगला चान्स का सोडा..>> यावरून माझ्या तरुणपणची एक गंमत आठवली - गणेशोत्सवात 'गाढवाला शेपूट काढण्या'ची स्पर्धा सुरुं होती. डोळे बांधलेला माझा मित्र गाढवाचं चित्र काढलेल्या फळ्याऐवजीं गटाराच्या दिशेने भरकटला. गॅलेरीतून हें बघायला जमलेल्या बायका- मुलींच्या गर्दीतल्या एका मुलीने मिष्किलपणे हंळुच शेरा मारला ,' डोळे बांधले कीं माणूस आपल्या लायकीप्रमाणे जात असावा !'. गर्दींत पलिकडे असलेल्या माझ्या मित्राच्या बहिणीने मात्र तें ऐकल व घरीं यावरून भावाला पिडायला सुरवात केली. परीणाम असा झाला कीं माझा मित्र त्या मुलीच्या प्रेमातच पडला, इतका तो उत्स्फुर्त, खोडकर कॉमेंट त्याला आवडला !
इथल्या कॉमेंटस वाचून तुमचा भाऊ माबोच्या प्रेमातच नाही पडला मग मिळवलं ! Wink
तुमच्या भावाचं अभिनंदन व त्याला शुभेच्छा.

श्रावण बाळ चा हिरो मा म तु झा मधे नायिकेच्या कॉलेज मित्रांच्या ग्रुपमधे एक मित्र होता. तेव्हा खुप काम नव्हतं त्याला.

अन्जू मी सध्या ह्या फिल्ड्मध्ये लिहित नाहिये..

माझ्या भावाचे नाव गणेश पंडित.

आमच्याकडे डेनवर आजपासून सुरु केलंय हे चॅनेल. काल नव्हतं दिसत. मी मोबाईलवर डिट्टो टिव्हीवर काल उशीरा दोन सिरीयल बघितल्या. एक इथेच टाका तंबु आणि लव लग्न लोचा. दोन्ही ब-या वाटल्या. बाकी सिरीयल्समधे मला इंटरेस्ट नाहीये.

२० रु. महीना भरुन डिट्टो दिसतं. फक्त मला मोबाईलवर बघायला नाही आवडत. आजपासून टीव्हीवर बघेन.

बर्‍याच दिवसांनी सक्षम कुलकर्णी दिसला काल टीव्हीवर.. लव लग्न लोचा मध्ये..

इथेच टाका तंबू - थोडासा अंदाज आलेला आहे कालच्या भागातच काय असू शकेल ह्याचा.. बोटीवर असणारा मालकांचा मुलगा आलाय कोकणात रिसॉर्टचा ताब घ्यायला आणि आता तो तिथेच अडकणार आणि रिसॉर्ट सांभाळणार. बरोबर वकिलांची मुलगी आहेच.. मग आज्जी पण येईलच गावात..

आज फ्रेशर्स बघितली, आजचा भाग आवडला मला. मुलं तिन्ही सहज अभिनय करतायेत. मुलींमधे मिताली छान करतेय. बाकीच्या नाही आवडल्या. प्रगल्भा अति लाडं लाडं बोलतेय. परीने आधीच्या मालिकेत चांगला अभिनय केला होता, इथे नाही आवडली. रश्मी अनपट मला आवडतंच नाही, ती नेहेमी एकाच टोनमधे बोलते.

एनिवे मिताली आणि तीन मुलं यांच्यासाठी बघेन कदाचित. श्रावणबाळ बघाविशी नाही वाटली, स्टार्ट बघुन टीव्ही बंद केला, दोन हिरॉईनमधली ऑफीसमधली आवडली मला, केतकी विलास (पालव). ती दुसरी प्रीती परी तुजवरतीमधे (स्टार प्रवाह) डबल रोलमधे होती, तेव्हाही नव्हती आवडली. ती मालिका माझी भाची होती थोडे दिवस म्हणून मी बघितली होती.

बन मस्का बघितली आज काही वेळ. हिरो आवडला मला. अभिनय चांगला करतो, चेहे-यावर अभिनयाच्या सुक्ष्म छटा छान दाखवल्यान आणि एकदम सहज.

Ho na hero chan ahe...n love lagna locha che pn chan ahet heroes..good acting.

काल त्या मानबा च्या वेळी साबानी चक्क चॅनेल चेंज करुन बन मस्का लावली. बरी आहे सीरेल. ती मुलगी गोड आहे. हिरोही छाने. तिचा भाउ आधी पण कशात तरी होता. आता आठवत नाहीये. आतिशा नाइक किती बारीक झालीये.

ती होतीना शेजारी शेजारी-पक्के शेजारी सिरीयल होती त्यात, तिथे मला जास्त आवडली होती, इथे माझं सगळं लक्ष हिरो वेधुन घेतोय, काय अभिनय यार. तिच्याकडे लक्षच नाहीये माझं. इथे नाही फारशी आवडली मला ती.

८ वाजता गोंधळ होतो माझा, रजनीकांतपण बघायची असते मला, मधेच ती अनिता दाते, मधेच बन मस्का. काल माझ्या तीन चॅनेल उड्या चालू होत्या Lol .

Kasla god n adnya dharak boyfriend ahe na to...:) nav pn mast ahe Saumitra ...mala khup avadte he name.
N L3 madhe to raghav...ky smile ahe yaar....Shiv tula competitors aale re baba ..

हो बन मस्का हिरोवर मी फिदा फुल टू ;).

राघव होता देवयानीमध्ये आणि त्याची हिरोईन काल जिचा b day दाखवला होता ती होती त्यात. राघव आणि सौमित्र डोळे छान आहेत दोघांचे.

मला लव लग्न लोचा सर्व मुलं आणि ती मेन जी लग्नासाठी मुलगा बघतेय पण तिला तो ओमकार गोवर्धन आवडतोय (उंच, खळ्यावाल्या), ती आवडली.

श्री आवडतोच आणि आमची माधवी आणि स्वरांगी (बालकलाकार) यांच्यासाठी इ टा तं बघतेय.

बन मस्का मध्ये ती family सौमित्रची आहे का? आणि हि भाड्याने राहतेय का?

Pages