खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौभाग्यवती बंद होतेय बहुतेक, रात्री ८.३० ची वेळ आहे, आजच प्रोमो दाखवतायेत. हिरो ओळखीचा वाटतोय. कुठेतरी बघितलंय त्याला.

हिरो ओळखीचा वाटतोय. कुठेतरी बघितलंय त्याला.

बहुतेक हिरो कर्लस च्या एका सिरिअलमध्ये आहे..>>>>>>जान्हवीचा भाऊ पिंट्या.

तो कारेदु मधला साईप्रसाद आहे. होसुमीयाघ मधला पिंट्या नाही.

पुन्हा एकदा बहुतेक प्रेमकथाच. झीला प्रेम, लग्न, नात्यांचे घोटाळे वगैरेचं एवढं का आकर्षण? Sad Angry

हिरो न हिरवीण दोघेही बंडल वाटतायत....>>
चला झाली सुरुवात नाव ठेवायला... आत्ता मज्जा येईल. मी अजून प्रोमो बघितलाच नाहीये. साईप्रसाद ठीक आहे... पिंट्या हिरो म्हणून सहनच नसता झाला.

झीला प्रेम, लग्न, नात्यांचे घोटाळे वगैरेचं एवढं का आकर्षण? >> बहुतेक सगळ्या चॅनेलवर हेच चालू असतं की. (एखादा अपवाद सोडून) हिंदी शिरेल तर बघवत नाहीत.. कोण कधी कोणाशी लग्न करेल, एकाच माणसाच्या किती बायका, कोण कोणाची मुलं या सगळ्याचा काहीच पत्ता नसतो. Uhoh

Laxmi chi sampte ahe mhanun tya don lokana bale balech jabardasti ubha kelay ase vatat ahe promo ....ky te hero heroine n ky te serial che nav.....sab bakwas.....kahitari satat suru rahile pahije evdech ....zee chi quality kadich ghasarliye.

साईप्रसाद आहे काय, का रे दुरावा मी त्याच्यासाठी दोन तीन दिवस बघितली होती, चांगलं काम केलं त्याने तिथे पण मला आठवेनाच तो. पण मेन हिरो म्हणून शोभेल का? साईड हिरो म्हणून बरा होता.

इथे नाही खास वाटत तो, ती पण नाही.

बहुतेक सगळ्या चॅनेलवर हेच चालू असतं की. (एखादा अपवाद सोडून) हिंदी शिरेल तर बघवत नाहीत.. कोण कधी कोणाशी लग्न करेल, एकाच माणसाच्या किती बायका, कोण कोणाची मुलं या सगळ्याचा काहीच पत्ता नसतो.>>>>
खरंय. पण आमच्याकडे फक्त झीमराठीच लावतात आणि न्यूज चॅनल्स. त्यामुळे बाकी चॅनेल्सवरचा गोंधळ माहिती नाही.

अरे ईथे सगळे फक्त झीच बघतात काय???? सहज पडलेला प्रश्न.

आज पासुन कलर्सवर एक नविन मालिका चालु होतेय तुझ्यावाचुन करमेना.
मला वाटले होते की कदाचित त्यावर एक धागा येईल.

हैला ! चला मज्जा मज्जा नवी शिरेल !
साईप्रसाद हीरो ? हीरविण कोण म्ह्णे?
पंतसचिव आईआज्जी गट्टु सारखी जानीमानी हस्ती पण असेलच की!

ओमप्रकाश शिंदे हिरो (का रे दुरावा मधला) आणि मयुरी देशमुख नामक हिरवीण आहे. दोघेही बेक्कार दिसतायत प्रोमो मध्ये. बाकी पुढे शिरेल बघितल्यावरच कळेल.:हाहा:

Pages