हितगुज दिवाळी अंक २०१२ - अभिप्राय

Submitted by संपादक on 12 November, 2012 - 18:57

मायबोलीच्या 'हितगुज दिवाळी अंक २०१२' बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले एकत्रित अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा. प्रत्येक लेखासाठी वेगळा अभिप्राय नोंदवायची सोय यंदा केली आहे. तसेच फेसबुक/गुगल+ वर "like" करण्याची सोयही दिलेली आहे.

-संपादक मंडळ

http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/index.html

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

रुप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजणी.
सुंदर मुखपृष्ठ!
पानांची मांडणी सुरेख.
नॅविगेशन सोपे आहे.
धन्यवाद संपादक मंडळ.
आता यथावकाश बाकी अभिप्राय देईन.

अंक प्रकाशनाबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन आणि आभार ! सकाळपासून कितीदा रिफ्रेश करून पाहिलं ह्याला गणतीच नाही. Happy
अंक अत्यंत देखणा झालाय. मुखपृष्ठवरची रंगसंगती छान आहे. प्रत्येक अनुक्रमणिकेवर केलेली सजावट खूप आवडली. त्या त्या विगाभाबद्दल सांगणार्‍या ओळीही मस्त आहेत. वरच्या बाजूला असलेले विभागांचे टॅब्स चांगले वाटत आहेत. संवाद विभाग तगडा आहे.
आत्ता फक्त चाळलाय. वाचायला खूप आहे. नंतर त्या त्या ठिकाणी प्रतिसाद देईनच.
पुन्हा एकदा नेत्रसुखद अंकाबद्दल मंडळाचे अभिनंदन.

यावेळी सजावट एक नंबर एकदम ! मुखपृष्ठ , आतली सजावट, विशेषतः प्रत्येक विभागाच्या अनुक्रमणिकेबरोबरची चित्रे, एकूण टेम्प्लेट सगळे सुंदर झालेय, अगदी व्यावसायिक अंकाच्या तोडीचे ! अभिनंदन !! अभिप्रा, बित्तुबंगा ही नावे असल्यावर असणारच होते म्हणा Happy

मैत्रेयी +१

खूप देखणा अंक. सगळी सजावट एकदम प्रोफेशनल. वा ! अंक वाचायची फारच उत्सुकता वाटतेय.

अतिशय सुंदर मांडणी, सगळे विभाग चाळून झाले आता वाचायला घेते. नॅव्हिगेशन सोपं आहे. अंक आवडला.

खूप देखणा , झुळझुळीत, नेत्रसुखद अंक. आँखों में ठंडक पड गयी!
भरगच्च तरीही सुटसुटीत. दमदार , वजनदार.

ललितमधल्या 'आजोबांचे चित्र' या अरभाट यांच्या लेखनासाठी 'हे पान पहायची परवानगी नाही' असे उत्तर आले.
http://vishesh.maayboli.com/node/1282

आणि हो, सर्व पानांवर प्रतिसाद द्यायची सोय केल्याबद्दल स्पेशल धन्यवाद. Happy (तिथे देवनागरीत प्रतिसाद देता येत नाहीय्त पण )

ललितमधल्या 'आजोबांचे चित्र' या अरभाट यांच्या लेखनासाठी 'हे पान पहायची परवानगी नाही' असे उत्तर आले.
>>हेच लिहायला आलेले इथे. अजून दोन ललित लेखांबाबत हाच रिप्लाय येतोय

अंक फार सुंदर दिसतोय. सजावट देखणी आहे. रंगसंगती नेत्रसुखद झाली आहे. प्रत्येक विभागाच्या अनुक्रमणिकेतली रेखाटनं खास आहेत. ऋतुरंग, तंत्रमैत्र, ललित, कथाविश्व यांच्या अनुक्रमणिकेतली रेखाटनं विशेष आवडली. मुखपृष्ठ आवडलं. प्रथमदर्शनी एकदम आवडला अंक.

संपादकमंडळाचं अभिनंदन!

वाचून होईल तसे प्रतिसाद देईनच.

>>हेच लिहायला आलेले इथे. अजून दोन ललित लेखांबाबत हाच रिप्लाय येतोय>>

हे सुधारलं आहे. आता सर्व लेख वाचता येतील.

सुरेख मुखपृष्ठ, आणि टेम्पलेट :). रंगसंगती सुखद. सुरेख अंक. आता निवांत वाचते.
संपादक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन.

अत्यंत सुरेख आणि देखणा अंक..
संपादक मंडळाचे मनःपूर्वक कौतुक आणि खुप अभिनंदन !!!

अतिशय सुंदर मांडणी आणि सजावट.
मजा आ गया!!!
संपादक मंडळ आणि या अंकासाठी सहभाग असणार्‍या सगळ्यांचे कौतुक आणि अभिनंदन.

आम्हाला इतकी छान मेजवानी दिल्या बद्दल अनेक अनेक धन्यवाद!

!!! शुभ दिपावली !!!

अरे वा..... आला तर आपला दिवाळी अंक Happy
मुखपृष्ठ, आतील पानं अतिशय नेत्रसुखद आहेत. अंक उघडल्याबरोबर प्रसन्न वाटलं Happy
मांडणी, सजावट एकदम झकास Happy
कधी एकदा वाचायला सुरवात करेन असं झालंय पण १-२ दिवस घाईचे असल्यामुळे इंतजार करना पडेगा !!
सगळ्या टीमचं हार्दिक अभिनंदन Happy

मस्त झालाय अंक. मुखपृष्ठ भारी आहे. बाकी नॅविगेशनबद्दल सगळे म्हणतायत त्याला अनुमोदन.
संपादक मंडळाचे अभिनंदन.

वावा! फारच सुरेख दिसतो आहे अंक! Happy
सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन! एकच नंबर झालंय खरंच! अभिमानास्पद!

Pages