असं म्हणतात "A picture is worth thousand words !"
तर मायबोलीकरांनो, खालील प्रकाशचित्रांवरून एखादी कविता सुचतेय का ते पहा बरं!
नियम व अटी
१. खाली दिलेल्या चित्रांवर स्वरचित चारोळी पाठवा.
२. काव्य कुठल्याही वृत्तात, कुठल्याही छंदात चालेल, मात्र फक्त चारच ओळी.
३. एक सदस्य एका प्रकाशचित्राकरता एकच प्रवेशिका पाठवू शकतो.
४. प्रवेशिका स्वीकारण्यास, दि. १९ सप्टेंबर २०१२, गणेश चतुर्थी, या दिवशी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरवात होईल.
५. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. २९ सप्टेंबर २०१२, अनंत चतुर्दशी, या दिवसापर्यंत (अमेरिकेच्या पश्चिम किनार्याच्या प्रमाणवेळेनुसार) राहील.
६. स्पर्धा खुली होईल तेव्हा प्रत्येक प्रकाशचित्राच्या खाली प्रतिसादात, त्या त्या चित्रावरच्या चारोळ्या लिहावयाच्या आहेत.
७. या स्पर्धेकरता परीक्षक मंडळ नेमण्यात येईल.
८. स्पर्धेचा अंतिम निकाल अनंत चतुर्दशीनंतर काही दिवसात जाहीर करण्यात येईल.
९. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
प्रकाशचित्र क्र. १
प्रकाशचित्र क्र. २
प्रकाशचित्र क्र.३
*सर्व छायाचित्रे जिप्सी आणि बित्तुबंगा यांच्याकडून साभार.
या स्पर्धेबद्दल काही शंका
या स्पर्धेबद्दल काही शंका असल्यास येथे विचारू शकता. तुम्हा सगळ्यांचा भरगोस प्रतिसाद अपेक्षित आहे.
मस्तय ही स्पर्धा. :भाग घ्यावा
मस्तय ही स्पर्धा. :भाग घ्यावा का या विचारात पडलेली बाहुली:
संयोजक, स्पर्धा खुली झाली आहे
संयोजक, स्पर्धा खुली झाली आहे ना?
>>> क्षमा, सूचना नीट वाचल्या
>>>
क्षमा, सूचना नीट वाचल्या नव्हत्या बहुतेक!
आपुन तो इसमें जरूर भाग लेगा
आपुन तो इसमें जरूर भाग लेगा
सुंदर प्रकाशचित्र.. छान चॉईस
सुंदर प्रकाशचित्र.. छान चॉईस आहे.
मी पण भाग घेणार यात
मी पण भाग घेणार यात
चारच ओळींची कविता पाहिजे
चारच ओळींची कविता पाहिजे का?
एखादी छोटुकली पण चार पेक्षा जास्त ओळींची चालेल का?
@ नानबा, जास्त नको, फक्त चारच
@ नानबा,
जास्त नको, फक्त चारच ओळी.
काय बरं सुचेल मला ???
काय बरं सुचेल मला ???
स्पर्धा छानच आहे.
स्पर्धा छानच आहे.
मी पण भाग घेणार ......
मी पण भाग घेणार ...... याहू....... मस्त पर्वणी....
मंडळी, गणेशोत्सव आठ दिवसांवर
मंडळी,
गणेशोत्सव आठ दिवसांवर आलाय.या स्पर्धेची तयारी चालू केलीत ना?
तयारी सुरू करायला हवी आता
तयारी सुरू करायला हवी आता
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मुदत संपल्यामुळे प्रवेशिका
मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत. आपल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!