निरोप

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

येते म्यां जाऊन
तंवर नीट र्‍हावा
गप्पागोष्टी करताल
माजीबी याद काडा
*
दूरची हाय वाट
चाल व्हनार इक्ती
कुडी अक्षी गळनार
मन भिर्र पाखरावानी!
*
आन्भव जगायेगळे
पदरी मीबी बांदीन
सूर्य बगीन, चंद्र बगीन
आभाळ माथा धरीन
*
आसंल कदी चांदनी
सोबतीला येकुलती
वाटंल तिला बगून
कश्शी माझ्याच लेकीवानी!
*
गोळा करीन आटवनी
आन् गठुडं त्येंचं बांदीन
न्हेमीच जपीन मनात
मपली शिरीमंतीची लेनी
*
वाट चालता चालता
दिस सरुन जात्याल
मुक्कामाला सोबतीनं
अल्लाद आनून सोडत्याल
*
जसा सरंल प्रवास
समदं रितं रितं वाटंल
धा दिशांमदून कसा
बांध मनाचा फुटंल
*
पुन्ना कधी, केव्हा, कुटं
बगायाला ह्ये गावंल?
परतताना नगाधिराजाला
साकडं मग मी घालंल
*
येऊ दे की रं मला
वर्साला दर येकदा तरी
काळजात साठवीन तुला
मन व्हईल समाधानी
*
तर, भ्येटूच आपन लौकर
ती खात्री हायेच मला
आले की उलगडीन
निसर्गाअंगीच्या कळा
*
आता घेईन रजा
मागून येक मागनं
यारी दोस्ती इसरु नगा
आपुलकीचं लेनं

विषय: 
प्रकार: 

Happy
आवो जावा निवांत
हिकडे सरवे त्येच
वळुन बी बगु नगा
कायला हवे पेच ?

औंदा आमी न्हाई
याद यीलच मोप
सटवाय लिव्हुन गेली
परतेक भाळी जपताप

औंदा आमी न्हाई
याद यीलच थोडी
पहिलुन पडली नव्ह का
दुरपदीची कुडी

हा टीपी होता.
बाकी संदीप म्हणतो तसे' कळते की गेली वेळ, ना आता सुटणे हात, अपुल्याच मनातील स्वप्नें, घेऊन मिटावी मूठ' (हे शिरेस !!)

सगळे शब्द काही कळले नाहीत पण जेवढी समजली तेवढी भयंकर गोड आहे कविता. कदाचित अशा भाषेत आहे म्हणुन जास्तच गोड वाटली.

शैलजा मस्तच.. Happy
<<गोळा करीन आटवनी
आन् गठुडं त्येंचं बांदीन
न्हेमीच जपीन मनात
मपली शितिमंतीची लेनी>> छान वाटलं कडवं