Submitted by प्रकाश काळेल on 22 March, 2009 - 12:11
शिशीरातली सारी आखड होळीने जाळली
वसंतानेही बघ चहुकडे रंगपंचमी आरंभली
नव्या पालवीचा साज लेउन सृष्टीही नटली
नववर्ष स्वागता पक्षांनीही मैफील थाटली
यावर्षी किती हसलो,किती रडलो
हे गणित आता संपले !
सुखदु:खाची शिदोरी बांधून पदरी
हे वर्ष आता सरले !
चाखून गूळासोबत कडुनिंब,
या वर्षासही देउ प्रेमे अलिंगन
चल विसरु सारे तंटे, सोडू सार्या अढी
ऋणानुबंधांची उभारु उंचच उंच गुढी !
-----------------------------------------
सर्व मायबोलीकरांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हर्दिक शुभेच्छा !
-प्रकाश
गुलमोहर:
शेअर करा
मस्त गुढी
मस्त गुढी उभारली प्रकाश. तंटामुक्ती आंदोलनाचा अध्यक्ष केले पाहिजे तुला.
छान
छान
प्रकाश, कवि
प्रकाश,
कविता आवडली, आणि पोहोचवू इच्छित असलेला संदेश ही मिळाला...
फक्त एक बदल सुचवला तर चालेल का?
>>पक्षांनीही महफिल थाटली << यात महफिल च्या ऐवजी मैफल ही चपखल बसेल. योग्य वाटलं तर बदल कर, महफिल हा हिंदी किंवा मराठी कोणताच शब्द वाटत नाही. (निदान मला तरी, हिंदी शब्द बहुतेक मेहफिल आहे. )
चला,
चला, नववर्षाची सुरेख सुरूवात !! छान
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही )
गुढीपाडव्
गुढीपाडव्याच्या तमाम मा.बो.करांना शुभेच्छा !!!
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
सुंदर..... सर
सुंदर.....
सर्व मायबोलीकरांना गुढीपाडवा अन् नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
प्रकाश
प्रकाश छान.
जर चाखून गूळासोबत कडुनिंब, ऐवजी कडुनिंबासोबत गुळ केल तर ?
छान...
छान...
वार्याची
वार्याची बात !
वार्यावरची नाही !! ---
" जागुताई,
गोडानंतर कडू आवडत नाही वाटतं?
कवितेत चालतं बरं!
चल विसरु सारे तंटे,
उंच गुढी उभारु !
हार्दिक शुभेच्छा!!!
"
सुंदर.....प्र
सुंदर.....प्रकाश तुलाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्व मायबोलीकरांना गुढीपाडवा अन मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
उमेशराव,
उमेशराव, तुम्ही बहाल केलेल्या पदाला मी जाहीर राजीनामा देतोय !
दक्स आभारी आहे बदल करतो !
जागू ते सोबत आहे गं ! नंतरआधी काही नाही !
सर्वांना पुनश्चः शुभेच्छा !
प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
प्रकाश
प्रकाश शुभेच्छा आवडल्या
सर्व माबोकरांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
खुप
खुप छान.
गुढीपाडव्याच्या मा.बो.करांना शुभेच्छा
या
या गुढीपाडव्याच्या सर्व मायबोलीकरांना शुभेच्छा.....
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना
सुखा
समाधानाचे
आनंदाचे
भाग्याचे
आरोग्याचे
आणि सौख्याचे जावो.
----------------------------------
हे जीवन सुंदर आहे....
शुभेच्छां
शुभेच्छांबद्दल आभारी.
चल विसरु सारे तंटे, सोडू सार्या अढी
ऋणानुबंधांची उभारु उंचच उंच गुढी !
आवडले.
गुढी उभारू सुखाची
मरगळ घालवू गतवर्षाची
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
प्रोफेसरा
प्रोफेसरांच्या शब्दात
कबाबातली हड्डी गेली सोडून गेले बुडाबुडी
लंगोट बांधून तुले उचलतो उंचच्या उंच बांध गुढी