राशी भविष्य

Submitted by sahebrao ingole on 13 July, 2011 - 03:29

तो हळदी कुंकवाचा दिवस होता. तिने आज हि रोजच्या प्रमाणे साधीच साडी नेसली होती. बायका नटून आल्या होत्या.न राहवून मी हलकेच म्हणालो,
"काय ग, तिथे सर्वन समोर हि साडी चांगली दिसते काय..?..एखादी दुसरी घालायची असती..ती गुलाबी नेस ना..फार छान दिसते.."
" वा वा, मोठ्या घेवूनच दिल्यात तुम्ही..?..पेट्या च्या पेट्या भरून ठेवलयात..!..जळल माझ नशीब..कशी तरी एकच आहे.. तुमच्या मावस बहिणीच लग्न आहे म्हणून ठेवलीय..तुम्हाला तर काही वाटत नाही..पण मला पहाव लागत ना.." आता मात्र हा पाणउतारा मला पुरेसा होता. मी म्हणालो, " आग, काय म्हणालीस एकच साडी..? कपाटात तर झुरळ जायला जागा नाही.. अन त्या काही फाटलेल्या नाहीत...माझे प्रेस केलेले कपडे मला गव्हाच्या कोठीत ठेवावे लागतात..शर्टावर कधी आळी निघते तर कधी सोंडे किडे.. ती निळी काठा पदराची, पिवळी - लाईट वेट, मोर पंखी..हिरवी..."
तिने कानावर हात ठेवले आणि जोरात ओरडली.." सांगा, अजून सांगा, शंभर दोनशे साड्यांचे नाव सांगा..जशे काय मला रोज एक साडी घेवून देता...तरी बरं झालं , माझंच गणगोत घेतंय..तुमच्या गणगोताच बोट भर चिरगुट माहित नाही...गळ्यात फुटका मनी नाही..कानात टपर घालते. नाकात मेक्डावानी खडा. बाहेर जायची लाज वाटते म्हणून घरातच खपते...जळल मेलीच नशीब फुटक...कोणत्या भाड्खावू देवाण लिहील असल...माझ्या जीवनाचा सत्यानाश केला..." अन ती लगेच रडू लागली..मी म्हणालो, " आग, गोष्ट फक्त साडी बदलण्याची होती..त्या साठी एवढी बकबक..?"
ती पुन्हा रडत म्हणाली, " मी पागल कुत्री आहे ना..म्हणून तर एवढी बकबक करते..तुम्ही तर कवी अन लेखच नाहीत मोठे ऑफिसर आहात..महिन्याला जे आठ- दहा हाजार कमावता ते डोळे बंद करून माझ्या हातावर ठेवता...अन मी त्याची ऐश करते...सगळ मलाच लागत..तुम्ही वा-याकडे तोंड करता..तुमची पगार ठेवा तुमच्या जवळ अन धकवा घर कसं धक्वायचं ते..नशीब तर माझंच फुटलं होत जे तुमच्या दावणीला बांधलंय.. " अन आता ती उसासे घेऊन स्फुंदून रडू लागली...मला राहवले नाही मी म्हणालो...
" सॉरी बाबा, मला माहित नव्हत तुझ्याकडे एक हि साडी नाही म्हणून...हि जी नेसली ती देखील तुझी नाही...आता जा, बाहेर बायका तुझी वाट पाहत आहेत...पण हे तर सांग , जेवण कुठ ठेवलंय..?"
ती डोळे पुसत म्हणाली," खीर फ्रीज मध्ये ठेवलीय..पु-या टोपलीत आहेत..बटाटे शिजवून ठेवलेत..भाजी करायची बाकी आहे..त्या साठी कोथंबीर नाही.."
मी बटाटे शिजलेल्या कुकर मध्ये थंड पाणी टाकू लागलो...तिने माझ्या कडे तिरप्या नजरेने पाहिले आणि आरश्या समोर उभी राहिली...माझे लक्ष तिच्या कडेच होते...तिने पदराने डोळे पुसले..अगोदर तोंडाला क्रीम लावले..त्यावर पावडर, मग हातात कंगवा घेवून केस विंचरू लागली... मी खाली पाहून बटाट्याची साल काढत होतो..ती हलक्या आवाजात म्हणाली..चालले मी...अन तिने दरवाजा ओढून घेतला... ती गेली त्या दिशेने मी पाहतच राहिलो...तेवढ्यात बाहेर भाजी वाल्याचा आवाज आला...' भा s s s ss जी वाले...टमाटे s s s, बटाटे s s s, हिरवी मिरची s s s, कोथंबीर s s s, कडी पत्ता..' मी बाहेर गेलो..एकच रुपयाची कोथंबीर घेतल्याने भाजी वाल्याने कॅरीबेग दिली नाही..त्याने एक रुपाया घेतला आणि कोथंबीर एका कागदात गुंडाळून दिली...मी घरात आलो...बटाटे बारीक केले..कांदा चिरला, लसणाच्या तीन चार पाकळ्या ठेस्ल्या आणि कागदातून कोथंबीर घेवू लागलो तर माझे सहज लक्ष गेले..राशी भविष..माझ्या राशीला लिहिले होते....बायको सोबत विनाकारण भांडण होईल. माझी भविषवाणी खरी ठरली होती.
पण त्याला काय म्हणावे ते कळेनासे झाले होते..वर्तमान काळ, भविष्य काळ, कि भूत काळ? नव्हे तो फक्त होता काळ होता, ज्याला वेळच नसते.!
-साहेबराव इंगोले
औरंगाबाद
9158500214

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बायको सोबत विनाकारण भांडण होईल.>>>>> Lol बायको सोबत भांडणाला कारण लागते? बहुतेक राशी भविष्य लिहिणारा अविवाहित असावा. आणि त्याला भविष्य नीट लिहिताही येत नाही. त्याने तुमच्या राशीवाल्यांसाठी भाजी स्वस्त मिळेल अस लिहायला हव होत Lol १ रुपयाची कोथींबीर मिळाली राव तुम्हाला आजकाल भाजी वाले "त्यापेक्षा घेऊ नका" अस म्हणतात.

बायका काय बोलतील याचा नेम नाही. एके दिवशी दुपारच्या वेळी सर्व बायका आमच्या अंगणात दळण निवडत बसल्या होत्या. त्यातली एक जन सहज म्हणाली, " काय हो, गहू कसा आणला..?"
दुसरी म्हणाली " पिशवीतून "
तिसरी ने विचारले, "आग, म्हणजे कोणत्या भावाने"
पहिली म्हणाली, "माझ्या चुलत भावाने "
दुसरी जाम चिडली आणि म्हणाली, " आगं, म्हणजे केव्ढ्याचा..ते सांग.."
" बाई, बाई, त्याच्या कडे आमचे जेवढे पैसे होते तेवढ्याचा.."
"आग, पण किती पैसे होते..?"
"ते बाई, मला काय माहित, आमच्या सोनूच्या पप्पाने त्याला किती पैसे दिले होते..ते त्यांच त्यांनाच ठावूक!"

-साहेबराव इंगोले
# ९१५८५००२१४
औरंगाबाद