ओला कचरा निर्मुलन कसे कराल. (गांडुळखत)

Submitted by कांदापोहे on 4 June, 2011 - 03:50

फोटो मोबाईल कॅमेराने काढले आहेत त्यामुळे जरा खराब आले आहेत. क्षमस्व. Happy

आरती हीने मागे इथे (http://www.maayboli.com/node/5886) कचरा व्यवस्थानाबद्दल लिहीलेच होते. त्यानंतर काहीच दिवसात महानगरपालीकेने सोसायटीला ओला कचरा सोसायटीने जिरवणे गरजेचे आहे यावर एक छोटेखानी संवाद आयोजला होता. ओला कचरा जिरवण्यासाठी गांडुळखत प्रकल्प राबवला नाहीत तर नोटीस बजावु असे सांगीतल्यावर सोसायटी खडबडुन जागी झाली. साधारण १५ हजारापासुन ३० हजारापर्यंत वेगवेगळ्या निविदा पण गोळा झाल्या. त्याच दरम्यान सोसायटीमधी राजेश या मित्राने एवढा खर्च करायची गरज नाहीये आपण स्वस्तात हे सर्व करु शकतो असे सांगीतले. मी पण नुकताच आरतीचा लेख वाचला असल्याने त्याला सहकार्य करीन अशी आशा दाखवली व साधारण १ वर्षापूर्वी आम्ही ही मोहीम हातात घेतली.

सुरुवातीला अनेक सोसायटीमधे खर्च करुन केलेले गांडुळखत प्रकल्प पण बघीतले. त्यापैकी निम्म्याहुन अधिक नुसते दिखाव्याकरता उघडले होते. त्या त्या सोसायटीतले लोक ना त्यात कचरा टाकत होते ना त्यात तयार होणारे खत वापरत होते. आमचा थोडा धीर खचला होता. अशातच मित्रमंडळ चौकातील एका बंगल्यातील काकांचा पत्ता मिळाला. मी व राजेश त्यांनी काय केले आहे ते बघायला गेलो व आमचा उत्साह द्विगुणीत झाला. अतिशय कमी खर्चात व कमीत कमी साधनात त्यांनी कचर्‍याचा निचरा केला होता. त्यांचा गॅलरीत सुरेख खत तयार होत होते व त्या बोळातील पालापाचोळासुध्दा ते गोळा करुन खत तयार करत होते. ४-५ इंच पिट्समधे आलेले पपईचे झाड, वांगी, पालक बघुन आम्ही चकीत झालो होतो. वाटेत येतानाच ठरवले की बास आता आपला प्रकल्प झाला.

पुणेरी पाटी हवीच. Happy

गांडुळ खतासाठी लागणारे साहीत्य खालीलप्रमाणे.

१. विटा
२. प्लॅस्टीकचा कागद किंवा जुना फ्लेक्सबोर्डचा प्लॅस्टीकचा कागद
३. हिरवी मेश
४. नारळाच्या शेंड्या/ आंब्याचे गवत असल्यास
४. गाडुळ खत, व्हर्मीकल्चर किंवा कुणी गांडुळांचा पुंजका दिला तर तो पुंजका
५. थोडी काळी माती
६. अर्थात ओला कचरा

पिट्स कशी बनवाल

१. साधारण आपल्या गरजेचा अंदाज घेऊन तेव्हढ्या आकाराचे प्लॅस्टीक घ्या. घरातल्या घरात करणार्‍यांनी रंगाच्या दोन डब्यातही करायला हरकत नाही.
२. ते जमिनीवर अंथरा व त्याच्या बाजुने विटांची रांग करा.
३. दोन ते तिन थर पुष्कळ होतात. शक्यतो भिंग बांधताना लावतात तशी विट लावावी म्हणजे पाण्याचा निचरा पण होतो आणी हवाही खेळती रहाते.
४. दुसरा थर झाला की हिरवी मेश चारी बाजुने अंथरुन घ्या.
५. सर्वात खाली नारळाच्या शेंड्या वा गवत टाका.
६. यावर तुमचा ओला कचरा, पालापाचोळा व माती टाका.
७. शक्यतो कचर्‍यामधे प्लॅस्टीक जाणार नाही याची खात्री करुन मगच कचरा टाकत जा.
८. यावर तुम्ही आणलेले गांडुळ खत, व्हर्मीकल्चर किंवा गांडुळांचा पुंजका त्यावर टाका.
९. जमल्यास शेणाचे पाणी शिंपडले तरी चालेल पण गरज असतेच असे नाही.
१०. साधारण १०-१२ दिवसांनी तुम्हाला एका बाजुचा कचरा काळा होताना दिसेल.
११. पालापाचोळा व कचरा जेव्हढा पटकन कुजेल तेव्हढे पटकन गांडुळखत तयार होईल.

हे घ्या संदर्भासाठी पिट

काळजी कशी घ्याल.

१. या कचरा टाकतो त्या जागेवर खुप उन्ह पडणार नाही हे पहा.
२. थोडा ओलसर राहील अशी काळजी घ्या. ओला कचरा असल्याने ओलसरपणा असतोच पण नसल्यास थोडे पाणी शिंपडा.
३. तयार गांडुळखताचे वेगळे पिट करा व त्यामधे झाडे लावा अथवा ते तयार खत आपल्या बगीच्यात पसरुन टाका

माती तयार झाल्यावर केलेल्या पिटात आता भोपळा व रताळी आहेत.

प्राथमीक शिक्षणाची गरज

१. सोसायटीमधील वा घरातील बायकांना ते पुंजके वगैरे बघुन भयंकर किळस येईल पण तरीही ते कसे उपयुक्त आहे हे पटवुन द्या.
२. ओला कचरा म्हणजे काय तेही समजावुन सांगा. यात भाज्यांची देठे, खराब झालेले अन्न, ब्रेड, अंड्याची टरफले, पोळ्या, आमटी असलेही प्रकार चालतात.
३. तयार झालेली माती इतर कुंड्यांमधे वा जमिनीमधे पसरुन टाका.

तयार माती.

मैत्र जिवांचे

गेल्या वर्षभर घेतलेल्या मेहेनतीमुळे सोसायटीतल्या गच्चीवर आज पेरु, डाळींब, चिक्कु, मोगरा, गुलाब, पपई, भोपळ्याचा वेल, रताळ्याचा वेल वगैरे उगवला आहे. साधारण २-३ कुंड्याना पुरेल एवढीच माती आम्ही सुरुवातीला आणली होती. आज साधारण २०-२२ रंगाचे डबे निरनिराळ्या वेली, फुलझाडांनी भरले आहेत. ही सर्व माती ही गांडुळखतातुन तयार झालेली आहे. नुकतेच सोसायटीला एक प्रशस्तिपत्रक पण मिळाले. या कामात मी व राजेश याने सुरुवातीला बरेच कष्ट केले. कचरा निवडणे, गांडुळे हलवणे, तयार खत खालच्या बागेत टाकणे वगैरे.

गेले वर्षभर सोसायटीतुन ओला कचरा बाहेर गेला नाहीये याचा आम्हा दोघांनाही भयंकर आनंद होतो. अजुनही काही सभासद सहकार्य करत नाहीत व ओला कचरा अजुनही विभागुन टाकत नाहीत त्यावर उपाय म्हणुन खाली सहकार्य करावे अशा पाट्या पण लावल्या आहेत. (लवकरच त्या पुणेरी पाट्यांमधे उपलब्ध होतील Proud )

मोगरा

टरबुज

रानजाई

लेख वाचुन आलेले काही प्रश्न व उत्तरे संकलीत करत आहे.

सावली | 4 June, 2011 - 16:22
वा अभिनंदन आणि खुप चांगली माहीती.
कचरा टाकायचा पिट झाकायची गरज नसते का? पावसात काय करता?

प्रतिसाद मंजूडी | 4 June, 2011 - 16:49
केपी, अन्नपदार्थ चालतात? आम्हाला सांगितलेलं की साधा भात घातला तर चालेल पण ज्यात मीठ आहे असे पदार्थ घालू नका.

प्रतिसाद अश्विनी के | 5 June, 2011 - 23:35
मसालेदार पदार्थ टाकू नयेत. खरकटं टाकायचं असेल तर धुवून टाकावे.

सावली, बाहेर पिट करायचे नसेल तर घरात, बाल्कनीत कुंडीत /बालदीत गांडूळशेती होऊ शकते. व्यवस्थित कृती अंमलात आणली तर गांडुळं त्यांचं घर सोडून बाहेर येत नाहीत आणि वासही येत नाही. साधारण दिड दोन महिन्यांनी कुंडी खताने भरते. नंतर २ दिवस त्यात पाणी, कचरा घालायचं नाही. मग पुन्हा कुंडी तयार करावी. जमिनीवर वर्तमानपत्रं पसरुन त्यावर खत भरलेली कुंडी उपडी करावी व थोडावेळ तसंच राहू द्यावं. आतली संख्या वाढलेली गांडुळं गुंडा करुन खताच्या खाली मध्यभागी जमा होतात. नंतर वरवरचं सुकं खत काढून घ्यायचे आणि गांडुळं परत सगळा जामानिमा केलेल्या कुंडीत सोडायची.

प्रतिसाद कांदापोहे | 6 June, 2011 - 09:25
केश्वे, मंजुडे आमचा अनुभव असा आहे की जे काही खरकटे आहे ते टाकले तरी गांडुळे त्याची मस्त काळी माती करतात. आमच्याकडे उरलेला भात, आमटी, सुकलेल्या भाज्या, चिरलेल्या भाज्या, जुन झालेली कणसे, फणसाची सालं, पोळ्या, ब्रेड, अक्खे कोबी वगैरे काहीही पडते ओल्या कचर्‍यात. बीट, बटाटे, कोबी असले काही टाकले तर ते थोडे कापुन टाकले तर पटकन विघटन होते. मुळात कचरा विघटन करत असताना पहीले १०-१५ दिवस काळजी घ्यावी. एकदा ते चक्र चालु झाले की गांडुळ वाट्टेल त्याचा खातमा करतात.

सावली तुमच्या गावी जरा मोठे पिट घेतले तर चांगले होईल. साधारण २ फुट उंचीचे. जागा मोठी असेल तर ३ वेगवेगळी पिट करुन एका आठवड्याच्या अंतराने कचरा टाकताना पिट बदलावे. अनेक सोसायट्यांमधे वाराप्रमाणे पिट्स असतात. (ज्याचा ते उपयोग करत नाहीत ही गोष्ट वेगळी) पण तसा प्रयोग करता येईल.

प्रतिसाद आऊटडोअर्स | 6 June, 2011 - 10:10
एक शंका - या ओल्या कचर्‍यात नॉन व्हेज टाकलेलंसुद्धा चालतं कां? उत्तर हो असेल तर काय-काय?

प्रतिसाद अश्विनी के | 6 June, 2011 - 10:11
केपी, गांडुळं अक्षरशः काहिही फस्त करतात पण शक्यतो खूप मसालेदार पदार्थ टाकू नये. आपल्या या मित्रांना ते चालत नाहीत. तू वर लिहिलेल्या त्यांच्या मेन्यूमध्ये मसालेदार काही दिसत नाहिये.
का?

प्रतिसाद कांदापोहे | 6 June, 2011 - 10:22
आडो नॉनव्हेज पण चालते व काहीही चालते.

एक गंमत निदर्शनात आली आहे. भुइमुगाच्या शेंगांची टरफल एक एक वर्ष कुजत नाहीत व गांडुळही ती फस्त करत नाहीत. त्यामुळे खाली जो नारळाच्या शेंडीचा थर आहेत त्यात ही टरफल टाकली तरी चालतील.

केश्वे आमटी, हॉटलच्या भाज्या, मसालेभात वगैरेमधे असतात की मसाले. तुझे व माधवचे म्हणणे बरोबर आहे पण माती हलवताना, कचरा हलवताना त्यांना इजा होणे, जास्ती पाणी झाल्यास वाहुन जाणे, पक्षांनी खाणे असे प्रकार होतातच. त्याला काही इलाज नाही. एकदा का ते चक्र चालु झाले की त्यांचे प्रमाण एवढे जास्ती असते की आपणही फार वाईट वाटुन घेत नाही. (वर मी लिहीलंय त्याप्रमाणे पुंजके तयार होतात)

संपादन प्रतिसाद अश्विनी के | 6 June, 2011 - 10:21
नारळाच्या शेंडीचा थर आहेत त्यात ही टरफल टाकली तरी चालतील.
>>> हो केपी. आम्ही जोडीला एखादी शेणीसुद्धा मोडून घालतो.

प्रतिसाद अश्विनी के | 6 June, 2011 - 10:27 नवीन
वर मी लिहीलंय त्याप्रमाणे पुंजके तयार होतात >>>> त्या पुंजक्यांमधली थोडीच गांडुळं परत त्यात सोडायची, बाकिची लोकांना वाटून टाकायची. ठराविक जातीची गांडुळं वापरल्यास चांगले रिझल्ट मिळतात त्यामुळे ती जास्तीची गांडुळंच लोकांना वापरण्यास द्यावीत. सगळीच्या सगळी गांडुळं आपल्या कुंडीत घातली तर त्यांची प्रजा भरमसाठ वाढून बाहेर येऊ लागतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा केप्या! keep it up!!
एवढ्या उपयुक्त माहितीबद्दल खूप धन्यवाद.

केपी, अन्नपदार्थ चालतात? आम्हाला सांगितलेलं की साधा भात घातला तर चालेल पण ज्यात मीठ आहे असे पदार्थ घालू नका.

एकदम सही उपक्रम. सातत्याने वर्षभर उपक्रम केल्याबद्दल आणि तो चालू ठेवल्याबद्दल तुम्हा दोघांचे अभिनंदन. देव तुमच्या कॉलनीतल्या इतर लोकांनापण या प्रकल्पात हिरीरीने भाग घ्यायची बुद्धी देवो.

मसालेदार पदार्थ टाकू नयेत. खरकटं टाकायचं असेल तर धुवून टाकावे.

सावली, बाहेर पिट करायचे नसेल तर घरात, बाल्कनीत कुंडीत /बालदीत गांडूळशेती होऊ शकते. व्यवस्थित कृती अंमलात आणली तर गांडुळं त्यांचं घर सोडून बाहेर येत नाहीत आणि वासही येत नाही. साधारण दिड दोन महिन्यांनी कुंडी खताने भरते. नंतर २ दिवस त्यात पाणी, कचरा घालायचं नाही. मग पुन्हा कुंडी तयार करावी. जमिनीवर वर्तमानपत्रं पसरुन त्यावर खत भरलेली कुंडी उपडी करावी व थोडावेळ तसंच राहू द्यावं. आतली संख्या वाढलेली गांडुळं गुंडा करुन खताच्या खाली मध्यभागी जमा होतात. नंतर वरवरचं सुकं खत काढून घ्यायचे आणि गांडुळं परत सगळा जामानिमा केलेल्या कुंडीत सोडायची.

अश्विनी धन्यवाद Happy
मला गावात बाबांना याची माहीती द्यायची आहे त्यामुळे हि खुप उपयोगी माहीती.
पण गावात झाडांच्या पडणार्‍या पानांचे (खुप झाडे आहेत) आणि भाज्यांच्या वाफ्यात भाज्या येऊन गेल्यानंतर उरलेल्या सुकलेल्या झाडांचे, नारळाच्या शेंड्यांचे खत बनवायचे आहे. त्यामुळे पिट खुप मोठा आणि बाहेरच करावा लागेल. म्हणुन मी पावसाचे आणि झाकणाचे विचारत होते.
शिवाय कचरा टाकायला आणि नंतर खत काढायलाही सोयीचा असला पाहिजे नाहीतर खत काढता यायचे नाही.

केश्वे, मंजुडे आमचा अनुभव असा आहे की जे काही खरकटे आहे ते टाकले तरी गांडुळे त्याची मस्त काळी माती करतात. आमच्याकडे उरलेला भात, आमटी, सुकलेल्या भाज्या, चिरलेल्या भाज्या, जुन झालेली कणसे, फणसाची सालं, पोळ्या, ब्रेड, अक्खे कोबी वगैरे काहीही पडते ओल्या कचर्‍यात. बीट, बटाटे, कोबी असले काही टाकले तर ते थोडे कापुन टाकले तर पटकन विघटन होते. मुळात कचरा विघटन करत असताना पहीले १०-१५ दिवस काळजी घ्यावी. एकदा ते चक्र चालु झाले की गांडुळ वाट्टेल त्याचा खातमा करतात.

सावली तुमच्या गावी जरा मोठे पिट घेतले तर चांगले होईल. साधारण २ फुट उंचीचे. जागा मोठी असेल तर ३ वेगवेगळी पिट करुन एका आठवड्याच्या अंतराने कचरा टाकताना पिट बदलावे. अनेक सोसायट्यांमधे वाराप्रमाणे पिट्स असतात. (ज्याचा ते उपयोग करत नाहीत ही गोष्ट वेगळी) पण तसा प्रयोग करता येईल.

धन्यवाद केपी.
जागाच जागा आहे Proud
३ पिट वाली कल्पना पण चांगली आहे. सध्या बाबांचे मन वळवणे चालु आहे कारण काम शेवटी त्यांनाच करायचे आहे.

केपी, मनापासून अभिनंदन. खूपच छान उपक्रम आहे.

एक शंका - या ओल्या कचर्‍यात नॉन व्हेज टाकलेलंसुद्धा चालतं कां? उत्तर हो असेल तर काय-काय?

सावली, आम्ही थोड्याच दिवसांत ठाणे मेंटल हॉस्पिटल येथे मोठ्या प्रमाणावर गांडुळ खताचा प्रकल्प सुरु करत आहोत. तिथे अधून मधून जायची संधी मिळेल, तेव्हा नक्की काय केलंय ते पाहू शकेन. त्यातून ज्याअर्थी तिथल्या पेशंट्सना कार्यमग्न ठेवण्यासाठी पेशंट्सना बरोबर घेऊन हा प्रकल्प राबवायचा बेत आहे म्हणजे सोपं करुन दिलेलं असेल. तुझ्या बाबांना जास्त प्रमाणावर गांडुळशेती करायची असली तरी ती सोपी कशी करता येईल हे मी तुला मी स्वतः तिथे जाऊन आल्यावर विपुत कळवेन Happy

केपी, गांडुळं अक्षरशः काहिही फस्त करतात पण शक्यतो खूप मसालेदार पदार्थ टाकू नये. आपल्या या मित्रांना ते चालत नाहीत. तू वर लिहिलेल्या त्यांच्या मेन्यूमध्ये मसालेदार काही दिसत नाहिये.

केपी मस्त माहिती. अश्विनीने दिलेली माहिती पण तेवढीच मोलाची आहे. मागे आरतीचा लेख वाचून मी गांडूळखत करण्याचा प्रयत्न केला होता पण तयार झालेले खत कुंडीत घालताना माझ्याकडून बरीच गांडूळे मेली. मग मी पुन्हा त्या भानग्डीत पडलो नव्हतो - जे आपल्याला मदत करतात (केपीचे 'मैत्र जिवांचे' हे शब्द अगदी योग्य आहेत) त्यांनाच मारल्याने मला वाईटच वाटले होते.

केपी तुझी हरकत नसेल तर आणि अश्विनीची परवानगी असेल तर ती माहिती पण मूळ लेखात समाविष्ट करशील का?

आडो नॉनव्हेज पण चालते व काहीही चालते.

एक गंमत निदर्शनात आली आहे. भुइमुगाच्या शेंगांची टरफल एक एक वर्ष कुजत नाहीत व गांडुळही ती फस्त करत नाहीत. त्यामुळे खाली जो नारळाच्या शेंडीचा थर आहेत त्यात ही टरफल टाकली तरी चालतील.

केश्वे आमटी, हॉटलच्या भाज्या, मसालेभात वगैरेमधे असतात की मसाले. तुझे व माधवचे म्हणणे बरोबर आहे पण माती हलवताना, कचरा हलवताना त्यांना इजा होणे, जास्ती पाणी झाल्यास वाहुन जाणे, पक्षांनी खाणे असे प्रकार होतातच. त्याला काही इलाज नाही. एकदा का ते चक्र चालु झाले की त्यांचे प्रमाण एवढे जास्ती असते की आपणही फार वाईट वाटुन घेत नाही. (वर मी लिहीलंय त्याप्रमाणे पुंजके तयार होतात)

नारळाच्या शेंडीचा थर आहेत त्यात ही टरफल टाकली तरी चालतील.
>>> हो केपी. आम्ही जोडीला एखादी शेणीसुद्धा मोडून घालतो.

उ त्त म! नेटाने प्रकल्प वर्षभर सुरु ठेवल्याबद्दल अभिनंदन केपी! Happy
पुणेरी पाटी वाचताना डोळे फिरतायत. Lol

आशू, माझे पण डोळे फिरले त्यामुळे मी त्या पाटीला पास दिला.

वर मी लिहीलंय त्याप्रमाणे पुंजके तयार होतात >>>> त्या पुंजक्यांमधली थोडीच गांडुळं परत त्यात सोडायची, बाकिची लोकांना वाटून टाकायची. ठराविक जातीची गांडुळं वापरल्यास चांगले रिझल्ट मिळतात त्यामुळे ती जास्तीची गांडुळंच लोकांना वापरण्यास द्यावीत. सगळीच्या सगळी गांडुळं आपल्या कुंडीत घातली तर त्यांची प्रजा भरमसाठ वाढून बाहेर येऊ लागतील.

>> सोसायटीमधील वा घरातील बायकांना ते पुंजके वगैरे बघुन भयंकर किळस येईल पण तरीही ते कसे उपयुक्त आहे हे पटवुन द्या.
>>

Happy

खुप छान माहिती दिलीस केपी. ते टरबुज तर काढून फस्त करावं असं वाटतय.

केपी अभिनंदन !
आरतीचा पण लेख खुपच उपयोगी होता.
फोटो खुपच उपयोगी.
मलापण आमच्या संकुलात हे करायचे आहे. सध्या टिम बिल्डिंग चाललेय. Happy

मी इथे आमच्या घरातील गांडूळ खत पिंजर्‍याचा फोटो टाकेन, म्हणजे घरगुती प्रमाणावर गांडूळ खत निर्मिती आणि कचरा निर्मुलन कसे होऊ शकते त्याची कल्पना येईल.

मंजुडे नक्की नक्की. घरच्या घरी जर हा प्रकल्प करायचा असेल तर दोन रंगाची दोन डबडी खुप होतात. एकात सुरु करायचे मग काही दिवसांनी डबा बदलायचा. आधीच्या डब्यातील खत कुंड्यांमधे घालुन टाकायचे व त्यातली जास्तीत जास्ती गांडुळे दुसर्‍या डब्यात टाकायची. हा.का.ना.का.

सोसायटीच्या गांडुळखतामधे आमच्या घरचा कचरा पडत नाही. Happy तो घरातच जिरवतो व तयार खत घरातील कुंड्यांना टाकतो. ती रानजाई त्याच खतात फुलली आहे.

केपी खुप खुप धन्यवाद अशी पुर्ण माहीती दिल्याबद्दल. आता मी पण माझ्या घरी हे गांडूळखत तयार करणार. तसे गांडूळ आमच्या कुंडीत, जमीनीवर असतात. तिच त्याच्यात टाकली तर चालतील का ? आणि पावसाळ्यात हे करता येईल का?

अभिनंदन! स्तुत्य उपक्रम!
आमच्या सोसायटीमध्ये ह्यासाठी पिट्स वगैरेची जय्यत सोय आहे. पण लोकांकडून ओला आणि सुका कचरा वेगळे करायचे सहकार्य अजिबात मिळत नाही. अतिशय बेपर्वा आहेत त्याबाबतीत! Sad तुमच्या सोसायटीत हे काम तुम्ही करू शकलात ह्याबद्दल अभिनंदन!!

अभिनंदन! स्तुत्य उपक्रम!

मला घरी मोगरा गुलाब उगवायची भयंकर इच्छा आहे त्यामुळे मी हा प्रयत्न करून बघेन. पर्यावरण संवर्धना बाबत एक मजबूत पाउल उचलल्याबद्दल अभिनंदन.

Pages