तृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान

एका प्रेमाची गोष्ट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

एक डॉलर आणि सत्यांशी सेंट्स. बास! त्यातले सुद्धा साठ सेंट्स नुसतीच एक एक पैशाची सुट्टी नाणी. कधी वाण्याशी, कधी भाजीवाल्याशी आणि कधी बेकरीत घासाघीस करून त्यातला एक एक पैसा जमला होता. डेलाने ते पैसे तीन तीन वेळा मोजले. एक डॉलर आणि सत्त्याऐंशी सेंट्स. क्रिसमस एक दिवसावर येऊन ठेपला होता. अतीव दु:खात डेलाने तिथल्या जुन्या जीर्ण सोफ्यावर झोकून देत हुंदक्यांना वाट करून दिली. याखेरीज ती करू तरी काय शकत होती. आयुष्य हे असेच सुख दु:खानी विणलेले असते ह्याची टळटळीत शिकवणच तिला मिळत होती जणू. सुख थोडे आणि दु:ख भारी!

विषय: 
प्रकार: 

स्पेशल वार्डातल्या म्हातार्‍या

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आमच्या घरात बैठकीच्या खोलीला लागूनच बेडरूम आहे. घरात कुणी आजारी असलं की पेशंटचा मुक्काम त्याच खोलीत असतो. सध्या आमच्या म्हातारीची रवानगी त्या 'स्पेशल' वॉर्डात. दरवर्षी श्रावणात आईला दम्याचा खूप त्रास होतो. दर काही वर्षांनी त्या खोलीत मुक्काम पडेल इतका जास्त होतो. आईच्या दिमतीला बहिणी एक एक करून राहून आल्या. सध्या मावशी तिथे गेलीये. सात वर्ष देशाबाहेर व्यतीत केल्यावर तिच्या आजारपणावर ब्लॉग लिहिण्याइतका कोडगेपणा येत असावा. तर काल मावशीशी बोलत होते. ह्या दोघी बहिणी एका कॉटवर एक अशा गप्पा करत 'पडल्या' होत्या आणि मी फोन केला. आईच्या भेटीस जाता येत नाही हा सल आहेच.

विषय: 
प्रकार: 

परेड स्पेक्टॅक्युलर

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

इथे आल्यापासून नवीन वर्ष सुरू झालं की करायच्या अनेक कामांमध्ये एक असतं वर्षभराचे परेड कॅलेंडर बघून कालनिर्णयावर नोंदी करून ठेवणे. आम्ही राहतो ते गाव आणि शेजारचं स्टॅमफर्ड इथे काही ना काही निमित्ताने वर्षभर परेड्स निघतात. वर्षातली पहिली सेंट पेट्रिक डे परेड झाली की मग ईस्टर परेड, इंडिपेंडन्स डे परेड, मेमोरियल डे परेड, हॅलोवीन परेड आणि वर्षाची सांगता करणारी थँक्स गिव्हिंग परेड. काही ठिकाणी सँटा परेड पण असते. इथे ईस्ट कोस्टवर न्यू यॉर्क सिटी आणि स्टॅमफर्ड ह्या दोन थँक्स गिव्हिंग परेड्स प्रसिद्ध आहेत.

प्रकार: 

दोन नमुने

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कडकडून भूक लागली होती. घरून डबा आणला होता. गरम करायला पँट्रीत गेले. दोन्ही मायक्रोवेव्ह मध्ये अन्न गरम होत होतं. मला थांबणं भाग होतं. काही काही लोकं ७-८ मिन. अन्न गरम करत ठेवतात. फ्रोझन मील असेल तर ठेवावंच लागतं. मला फार गरम अन्न आवडत नाही. पण अगदी गार सुद्धा घशाखाली उतरत नाही. पण त्या १ मिनिटासाठी नेहमी ताटकळत उभं राहावं लागतं. कुणी ओळखीचं किंवा टीममधलं भेटलं की वेळ बरा जातो. नाही तर तिथल्या लोकांच्या कानावर आदळणार्‍या गप्पा आपण त्यातले नाहीच असं दाखवत ऐकत उभं राहा. हा त्या दिवशी कानावर आदळलेला संवाद-
'मस्त वास येतोय. काय आहे ?'
'बिर्याणी ! तुला आवडते का ?'

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

आनंदी जोडपं

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आटपाट नगरात एक जोडपं राहत होतं आनंद आणि आनंदी. गृहलक्ष्मीच्या नावासारखंच आनंदी. आनंदचे घराणे थोर. आनंदी देखील उच्च कुळातली थोरा घरची लेक. थोरल्याच्या जन्मानंतर नवसाने झालेली, लाडावलेली राजकन्याच. उंच, गोरी, देखणी रूपगर्विता. आनंदाईने लाडक्या लेकासाठी शोधून निवडून आणलेली. आनंद आणि आनंदी- लक्ष्मी नारायणाचा जोडा जणू. लग्न करून दूर देशी आली. भले मोठे घर. महाल जणू. घराला दारं-खिडक्याच सतराशे साठ. मोठे अंगण. परसात भाज्या. फुलं अन फळं. आनंदच्या प्रेमात आनंदी मोहरली. आनंदली.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

बर्फशिल्पे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

चेस्टर, कनेटिकट इथे दर वर्षी विंटर कार्निव्हल असतो. बर्फात केलेले कोरीव काम तिथले मुख्य आकर्षण असते असे ऐकून होतो. ह्या वर्षी प्रत्यक्ष बघायचा योग आला. तिथल्या ह्या काही कलाकृती:

IMG_2380upload.JPGIMG_2393_0.JPGIMG_2391_0.JPG

भाकरीचे लाडू

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

एक गरीब कुटुंब. जेमतेम हाता-तोंडाची गाठ पडणारं. सणवारास सुद्धा पोटभर जेवायला मिळालं तरी खूप, गोडधोड करणं तर दूरच. नवरा-बायको, दोन-तीन मुलं. सगळ्यात मोठी मुलगी. ह्या कुटुंबात कुठल्या तरी एका सुदिनी सगळ्यांची जेवणं झाल्यावर तीन-चतकोर भाकरी उरते. दुसर्‍या दिवशी मुलांना न्याहरी होणार म्हणून आईला बरे वाटते. पण सकाळी उठून बघते तर काय भांड्यात भाकरी नसतातच. आदल्या रात्री सगळे झोपल्यावर थोरलीला माजघरात जाताना तिने बघितलेले असते. रात्री तिनेच भाकरी खाल्ल्या असाव्यात अशा समजातून आई रागे-रागे मुलीला काही बाही बोलते. दुपारच्या जेवणात थोरली आईच्या पानात लाडू वाढते.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Merrier & merrier...the X'Mas !!!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

IMG_1483.JPG

यंदा ख्रिसमससाठी आम्हाला माझ्या आत्येभावाकडून बोलावणे होते. त्याच्या बायकोने- ब्याता- पोलिश पद्धतीने ख्रिसमस साजरा करायचा फतवा काढला होता. भावाने आणि मी कमीत कमी आल्याचा चहा मिळाला पाहिजे असे घोडे दामटायचा प्रयत्न केला पण आम्हाला, "Do not mess with my x'mas !!" अशी सक्त ताकिद मिळाल्यावर ख्रिसमसला आल्याचा चहा केल्यास पुढल्या वर्षी गणपतीत मोदकांच्या ऐवजी प्येरोगि मिळतील ह्या भितीने आम्ही चहा बासनात गुंडाळला.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

शिवणाची कात्री

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझ्या आईकडे एक 'शिवणाची कात्री' होती. होती म्हणजे अजून आहे. केशरी मूठ, मॅट फिनिशची पाती. ती कात्री म्हणजे आईच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. त्या कात्रीला हात लावायची आम्हाला कुणालाच परवानगी नव्हती. अगदीच उन्हाळ्याच्या सुट्टीत काही भरतकाम करायला घेतलं तर कटपीसमधून रुमालांचे चौकोनी तुकडे कापायला तेवढी ती कात्री हातात येई. पण चुकून जरी त्या कात्रीने कागद-बिगद (बिगद मध्ये पुठ्ठे, थर्माकोल, स्ट्रॉ, सुतळ्या, झाडांच्या फांद्या जे काही कापण्यासारखं असेल ते सगळं येतं) कापले की आईच्या नजरेला आणि आवाजाला त्या कात्रीची धार येई. आणि कात्रीची धार कमी होई. तसं पण अधनंमधनं तिची (कात्रीची) धार कमी होत असे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - तृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान