चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान

ब्रेल लिपीतली पुस्तकं

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर ताईआत्या राहायच्या. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांतच नवर्‍यानं त्यांना माहेरी आणून सोडलं. त्यांचं माहेर तसं श्रीमंत. मोठा भाऊ डॉक्टर. पण ताईआत्या मात्र बंगल्याच्या आऊटहाउसात राहायच्या. ताईआत्या उत्तम कविता करत. संध्याकाळी आई ऑफिसातून घरी आली की ताईआत्या घरी येत. त्यांना सुचलेली कविता आई त्यांच्या वहीत त्यांना उतरवून देई. ताईआत्यांना लिहिता वाचता येत नसे. त्या अंध होत्या.

प्रकार: 

सचिनचं द्विशतक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आज सचिनने आंतरराष्ट्रिय एक दिवसीय सामन्यात द्विशतक झळकवलं..
सचिनच्या विक्रमांच्या मांदियाळीत अजून एका विक्रमाची भर..

त्याला मानाचा मुजरा!!!

15_sachin_tendulkar_2.jpg

देवा, आमचा प्रणाम स्वीकार!!!

विषय: 
प्रकार: 

अन्नं वै प्राणा: (४)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

Sit at dinner tables as long as you can, and converse to your hearts’ desire,
for these are the bonus times of your lives. (Annals of the Caliphs’ Kitchens)

jalebi_coll.jpg
प्रकार: 

चांद्रयानाला गवसलं चंद्रावर पाणी...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

भारतानं गेल्या वर्षी अंतराळात सोडलेल्या चांद्रयानाला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शोध आहे. भविष्यात हाती घेण्यात येणार्‍या चांद्रमोहिमांना या शोधामुळे अतिशय वेगळी दिशा आता मिळणार आहे.

चांद्रयानावर असणार्‍या NASAच्या Moon Minerology Mapper (M3)नं मिळवलेल्या dataच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

चंद्रावरील मानवी वसाहत, अंतराळातील जीवसृष्टीचा शोध यांनाही आता वेग मिळू शकेल.

प्रकार: 

महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

महाराष्ट्रराज्यस्थापनेचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार असलेल्या आचार्य अत्र्यांनी 'माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्या राज्यांना फक्त भूगोल आहे', असे उद्गार काढले होते. आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरं वेगाने घडत असताना महाराष्ट्र व मराठी या दोहोंच्या भविष्याची आखणी करणं गरजेचं झालं आहे. मात्र भविष्याचा वेध घेताना भूतकाळ तपासून बघणं आवश्यक ठरतं. आचार्य अत्र्यांनी उल्लेखलेल्या इतिहासाचा वेध हा महाराष्ट्राच्या व मराठीच्या भूतकाळाचा प्रवासच आहे.

प्रकार: 

अन्नं वै प्राणा: (३)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट. भांडारकर संशोधन मंदिरावर काही गुंडांनी हल्ला करून ग्रंथालयाची नासधूस केली होती. तिथल्या कर्मचार्‍यांना मदत करायला आम्ही काही विद्यार्थी गेलो होतो. ग्रंथालयाची अवस्था अतिशय वाईट होती. कपाटं फोडलेली, पुस्तकं इतस्ततः फेकलेली. अनेक जुन्या, दुर्मिळ पुस्तकांची पानं निखळून वार्‍याबरोबर उडत होती. पोलीस, छायाचित्रकार, दूरचित्रवाणीचे छायाचित्रणकार ती पुस्तकं अगदी सहज तुडवत होते. एरवी सर्वत्र पोपटपंची करणार्‍या डगलेवाल्यांना, दाढीवाल्या समाजसेवकांना या ग्रंथालयात येऊन पुस्तकं आवरण्याचं काम करणं परवडण्यासारखं नव्हतंच.

प्रकार: 

श्री. कल्पेश गोसावी यांची सुलेखनचित्रे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

ब्राह्मणें बाळबोध अक्षर | घडसुनी करावे सुंदर |
जें देखताचि चतुर | समाधान पावती ||
वाटोळें सरळें मोकळें | वोतलें मसीचे काळे |
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे | मुक्तमाळा जैशा ||
अक्षरमात्र तितुकें नीट | आडव्या मात्रा त्या हि नीट |
आर्कुली वेलांड्या ||
पहिलें अक्षर जें काढिलें | ग्रंथ संपेतो पाहात गेलें |
येका टांकेंचि लिहिलें | ऐसें वाटे ||
अक्षराचें काळेपण | टांकाचे ठोसरपण |
तैसेचिं वळण वांकाण | सारिखेंचि ||
प्रकार: 

भरतभेट अर्थात पुण्यात झालेले एवेएठि

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

श्री. रॉबिनहूड व श्री. झक्की या दोन परममित्रांची भेट काल घडून आली. अनेक पुणेकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते. या निर्मळ आनंदाच्या क्षणांत आपल्यालाही सहभागी होता यावे, म्हणून ही प्रकाशचित्रे..

SA.jpg

विषय: 

रायगड

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

दोन दिवस सुट्टी होती म्हणून रायगडावर गेलो होतो. या प्रवासात काढलेली ही काही प्रकाशचित्रे..

गडावर प्रचंड गर्दी होती. त्यामुळे बरीचशी प्रकाशचित्रे संध्याकाळी किंवा सकाळी लवकर काढली आहेत.

नीरा-देवघर प्रकल्पाचे बॅकवॉटर..

Pages

Subscribe to RSS - चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान