Adm यांचे रंगीबेरंगी पान

हॅपी हॉलिडेज.. !

अटलांटामधल्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नववर्षानिमित्त दिव्यांची रोषणाई केली जाते. संध्याकाळी सूर्यास्त होता होता म्हणजे साधारण पाच वाजता बाग उघडते आणि १० वाजेपर्यंत उघडी असते. तसही थंडीमध्ये बर्‍याच झाडांची पानं गळून गेलेली असतात, फुलं, पानं बघायला येणार्‍या पर्यटकांचा ओघ आटलेला असतो. ह्या रोषणाईच्या निमित्ताने लक्ष दिव्यांनी उजळून निघालेली पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलून जाते. गेले दोन वर्ष ही रोषणाई बघायला जाणं राहून जात होतं, पण यंदा मात्र योग आला. तिथे काढलेल्या ह्या प्रकाशचित्रांसह तुम्हां सर्वांना आणि तुमच्या परिवाराला नाताळ तसेच नववर्षाच्या लखलखत्या शुभेच्छा !!

पश्चिमेतला स्वर्ग

अमेरीकेत आल्यापासून प्रत्येक लाँग विकेंडला भटकंती सुरुच असते. सेंट लुईस तसच अटलांटा ह्या दोन्ही ठिकाणांपासून एखाद-दोन दिवसांत बघता येतील अशी ठिकाणं पहाणं साध्या विकेंडना चालू असतं आणि लाँग विकेंडना मोठ्या ट्रिप. बरेच मित्र-मैत्रिणी अमेरीकेतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेले असल्याने त्यांच्या भागातल्या नविन नविन ठिकांणाबद्दल कळत असतं आणि मग तिथे जायचे प्लॅन्स ठरतात. अमेरीकेत यायच्या आधी नायगारा आणि ग्रँड कॅनियन सोडून बाकी काही नैसर्गिक गोष्टी बघण्यासारख्या आहेत हे माहित नव्हतं. योसेमिटी आणि क्रेटर लेक ही नावं मी साधारण दिड-एक वर्षांनंतर एका मित्राचे फोटो बघताना ऐकली होती.

नववर्षाच्या शुभेच्छा !

ह्या वर्षी भारतात घेऊन जाण्यासाठी तसेच इथल्या काही मित्र-मैत्रिणींना भेट देण्यासाठी काहितरी वेगळी गोष्ट शोधत होतो. कॉस्कोत फिरताना कळलं की आपण फोटो दिले तर ते त्यांची कॅलेंडर्स, कप्स, ग्रिटींग कार्ड्स इ बनवून देतात. त्यावरून आम्ही स्वतः काढलेल्या फोटोंची कॅलेंडर्स बनवून ज्यांना द्यायची त्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, इथले तसेच भारतातले सणवार त्यावर मार्क करून ती द्यायची अशी कल्पना सुचली. नंतर फोटो निवडताना एकच थीम निवडायच्या ऐवजी त्या त्या महिन्याचे वैशिष्ट्य दाखवणारे फोटो निवडले तर ते जास्त चांगलं वाटेल असं जाणवलं. मग आम्ही गेल्या वर्षभरात तसेच आधी काढलेल्या फोटोंपैकी १२ बरे फोटो निवडले.

कथाकथी

मध्यंतरी ऑफिसमध्ये एकाने विचारलं, "मला चांगल्या मराठी कथा वाचायच्या आहेत. सारखा मायबोली मायबोली करत असतोस.. तर तिथल्या कुठल्या कथा वाचू ते सांग आणि लिंक पण शोधून दे.. "
तेव्हा त्याला पटकन सापडतील अश्या कथांच्या लिंक दिल्या. (त्या अर्थातच यंदाच्या दिवाळी अंकातल्या होत्या. डोळा मारा )

अटलांटा १३.१

बर्‍याच दिवसांपासून ज्यासाठी तयारी (आणि चर्चा) चालू होती ती अटलांटा १३.१ हाफ मॅरेथॉन आज पार पडली.
दोन ५ के आणि दोन १० के रेसेसमध्ये भाग घेऊन झाल्यावर पुढची पायरी म्हणून हाफ मॅरेथॉन पळायची होती.
जुलै महिन्यातच रजिस्ट्रेशन केलं होतं. अटलांटा कंपूतले राहूल जोग आणि विनायक ह्यांनीपण पळायची तयारी दाखवली. राहूल पण १३.१ रेसमध्ये तर विनायक ५ के मध्ये सहभागी झाला होता. शिवाय आम्हांला चिअर करायला कंपूतले बाकीचे लोक, प्रमुख पाहूणी म्हणून नानबा आणि माझा मित्र रोहित हे पण उपस्थित होते.

"ओपन" अगासी.....

आंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफ हे माझे सर्वात नावडते टेनीसपटू. त्यामुळे आंद्रे अगासीचं "ओपन" हे आत्मचरित्र जेव्हा प्रसिध्द झालं तेव्हा ते वाचायची प्रचंड उत्सुकता वगैरे मला अजिबात नव्हती. आधीच अगासीचं पुस्तक, त्यात स्टेफी ग्राफ बद्दलही बरच काही येणार तेव्हा नकोच ते असा विचार करून मी एकदा जवळजवळ विकत घेतलेलं पुस्तक परत ठेऊन दिलं होतं. पण माझ्यातला टेनीस फॅन मला स्वस्थ बसू देईना. वेळ झाल्याझाल्या पहिल्यांदा लायब्ररीच्या वेबसाईटवर नंबर लावायला गेलो तर त्या पुस्तकासाठी माझा १५९ वा नंबर होता.

मातृदिन : नाच गं घुमा

मातृदिनाच्या कार्यक्रमांमधे माझ्या आईची ही कथा इथे देत आहे. १२ मार्च १९९२ ला मुंबईत जे बाँबस्फोट झाले होते त्या पार्श्वभुमी वर आईने तेव्हा ही कथा लिहिली होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्रावणसरी कोसळत होत्या. उनपावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. मंगळागौरीची रात्र, खेळाला अगदी रंग भरला होता. सगळ्याच जणी अगदी भान हरपून खेळत होत्या. लहानमोठ्या, म्हातार्‍याकोतार्‍या वय विसरून नाचत होत्या. ठेका छान जमला होता...
नाच गं घुमा,
कशी मी नाचू ?
नाच गं घुमा
नाचू मी कशी ?

वेगे वेगे धावू...

इथे अमेरीकेत कुठल्याही प्रकारच्या हवामानात एखादातरी उत्साही कानात हेडफोन लावून पळताना दिसतोच. जर हवा चांगली असेल तर पळण्याजोग्या जागी अगदी झुंबड उडालेली दिसते. तरूण लोकं, बाया-बापे, त्यांची पोरं-टोरं आणि अगदी त्यांची कुत्री-मांजरी सुध्दा पळत असतात ! भारतात पळण्याचं प्रमाण त्यामानाने इतकं दिसत नाही. "रोज सकाळी उठून जॉगिंगला जायचं" हा माझ्याप्रमाणेच कित्येक जणांच्या बाबतीत अनेक नववर्ष संकल्पांपैकी एक असतो ! लहानपणापासून 'धावणे' ह्या प्रकाराचं मला अजिबातच आकर्षण नव्हतं. शाळेमधल्या १०० मिटर वगैरे सारख्या शर्यतींमधे कधी विशेष उत्साहं नव्हता कारण तितकं वेगाने धावता यायचं नाही.

वेलकम टू द सिन सिटी !

नुकतीच लास वेगस आणि ग्रँड कॅनियन ट्रिप झाली. ह्यावेळी जवळ जवळ ५ दिवस मुक्काम असल्याने फार पळापळ नव्हती. त्यामुळे बर्‍याच कसिनोंना भेट देता आली आणि शिवाय रस्त्यात हवा तितका वेळ थांबून मनसोक्त फोटो काढता आले. बर्‍याच दिवसांनी खूप फोटो काढले. आणि चक्क नाईटमोड मधे काढूनही ते हलले नाहीत. त्यातले हे काही फोटो.

स्ट्रॅटोस्फिअरचे टॉवर :

Stratosphere.JPG

सर्कस सर्कस :
Circus Circus.JPG

विन :

वाढदिवस...

इथे आमच्या घरापासून दिड मिनीटाच्या अंतरावर एक डंकीन डोनट आहे. मला कधी अँटी-सोशलाईझिंगचा अ‍ॅटॅक आला, डोक्याला शॉट बसला (तो बसायला कुठलंही कारण पुरत.. स्मित ) , खरच कॉफी प्यायची खूपच तल्लफ आली किंवा काही वाचायचं असेल तर मी एखादं पुस्तक घेऊन तास-दोन तास तिथे जाऊन बसतो. तिथल्या माणसाला पण आता माझी स्मॉल कॉफी विथ क्रिम अँड शुगर आणि दोन चॉकलेट मचकीन ही ऑर्डर माहित झाल्याने अजिबातच काही सांगावं लागत नाही.. तिथे बाहेर पण टेबल खुर्च्या असल्याने हवा चांगली असली की मी बर्‍याचदा बाहेरच बसतो.. ओल्ड मिल्टन पार्कवे वरचा ट्रॅफिक बघत, येणार्‍या जाणार्‍या गाड्यांमधून उतरणारी माणसं बघत छान वेळ जातो...