गजानन यांचे रंगीबेरंगी पान

डुक्कर!

(स्मितागद्रे यांनी टाकलेली क्लेपासून बनवलेल्या सांताक्लॉजची प्रकाशचित्रं बघितल्यावर आम्हालापण स्फुरण चढले!
आकाराचा अंदाज येण्यासाठी - डोळे मंगळसूत्रात असतात त्या मण्यांच्या आकाराचे आहेत.)

तांबडा घोडा

एके दिवशी त्याच्या गावात आली विजय सर्कस.
करकचून बांधलेल्या बोचक्यांवर टांग टाकून बसलेल्या मालकांचा आणि भरतकाम केलेल्या रंगीबेरंगी पण कळकट-मळकट कपड्यांतील मालकीणींचा भार सांभाळत कसेबसे पाऊल टाकू शकतील अशी तीस-पस्तीस तांबडी घोडी.
आपल्या मालकांची वीस-पंचवीस नागडी-उघडी बारकी बारकी पोरं वाहणारी दहा-बारा गाढवं.
त्यांच्या आसपास चालणार्‍या काही पाऊलजोड्या.
गावात पारालगत मधोमध मोठ्ठं पटांगण आणि त्या पटांगणाला लागून उपटसूंभासारखं एक मोठ्ठं पडीक वावर.
हा भरगच्च तांडा गावात शिरला आणि वावरात जमा झाला.

हिरना... समझ-बूझ बन चरना

कुमारांचं निर्गुणी भजन ऐकत होतो.
कुमारांनी ते शब्द इतक्या आर्ततेने आळवलेत की काही केल्या ते शब्द विसरेनात. पण त्याचा अर्थ मात्र तितकासा कळला नाही.

शब्द असे आहेत -

हिरना...
समझ बूझ बन चरना
एक बन चरना
दूजे बन चरना
तीजे बन पग नही धरना

तीजे बन में पाँच पारधी
उन के नजर नही पडना
पाँच हिरना पच्चीस हिरनी
उन में एक चतुर ना

तोए मार तेरे मास विकावे
तेरे खाल का करेंगे बिछोना

कहे कबीरा जो सुन भइ साधो
गुरू के चरन चित धरना

इथून थोडा-फार अर्थ कळला. http://kabir-bani.blogspot.com/2009/10/5-hirana.html

हे हरिणा, या अरण्यात समजून-उमजून चर. अतिशय सावधगिरीने वावर.

झीं झीं झीं झिच्यकं झिच्यक्

घरी जुन्या संगणकाच्या पडद्याचे सुरक्षाकवच पडून होते. तेव्हा म्हटले ही गंमत करून बघूया.

एक पाऊण फुटाची पी.व्ही.सी. नळी आणि रिकामी हिंगाची डबी घेतली.

त्या काचेची बाजूची चौकट काढून टाकली.

हम को कापूस नै बोलने का

sasaa.jpg

"नारळाच्या आत पाणी" म्हैतंय. पण ससा पण?

मॉर्निंग रागा

चित्रपटात शास्त्रीय अंगाने एखादे गाणे असेल तर पडद्यावर ते तितक्याच बारकाव्याने साकारणारे कलावंत किती असतील? बर्‍याचदा अशा गाण्यांना पडद्यावर योग्य न्याय मिळत नाही. आज अचानक हा दुवा गवसला. तीनचार वेळा बारकाईने बघूनही हे ती स्वतःच गातेय असे वाटले. (तिच्यासारख्यांचा काय भरोसा नाय, एखाद्या पंधरा-वीस सेकंदाच्या सीनमध्येही जिवंतपणा आणण्यासाठी वाटेल ती मेहनत घेतील.)

इनीस पेक्षन

पळतोस कुठं? थांब, नखं दाखव बघू.

.
.
.

तू कितीही नाही म्हणालीस तरी...

तू कितीही नाही म्हणालीस
तरी...
माझ्या डोळ्यांत तूच आहेस
डोळे उघडे ठेवू की बंद करू
एवढाच एक पेच आहे

बंद केले,
तर साहेबाचं संकट आहे
उघडे ठेवले -
तर तुझ्याशी प्रतारणा आहे

साहेबाचं संकट ओढावायचं
की डुलकीशी प्रतारणा करायची
एवढाच एक पेच आहे

बाकी,
माझ्या डोळ्यांत तूच आहेस...

फ्लेमिंगो गटग - १३ फेब्रु २०११

गेला महिनाभर शक्य तेवढ्या बाफांवर मुंबईतल्या हितगुजकरांनी काळा घोडा नाच नाच नाचवला. १२ फेब्रुवारीला काळाघोडा फेस्टीवलात सगळ्यांनी भेटायचं असं पुन्हा पुन्हा सगळ्यांनी ठरवलं. १२ तारीख जवळ यायला लागली तशी आमच्या या वरातीतली एकेक सोंगटी माघार घ्यायला लागली आणि अकराच्या संध्याकाळपर्यंत तर घोड्याने मुलुंडबाफावरच बसणे पसंत केले. फिदीफिदी

मुलुंडावरूनच घोषणेची सुरुवात होऊन तिथेच ती विरून जावी.... यापेक्षा..... असो.

इंटरनेटवर भूमिती

हा दुवा पहा: http://www.mathopenref.com/index.html

तुमची मुलं माध्यमिक वर्गांत शिकत असतील तर या दुव्यावरील विविध अ‍ॅनिमेशनं त्यांच्या अभ्यासक्रमातल्या भौमितिक संकल्पना स्पष्ट करण्यास / त्यांची विषयातील रुची वाढवण्यास मदत करतील.

ही काही उदाहरणे बघा.

वर्तुळाचा केंद्रबिंदू शोधणे :
http://www.mathopenref.com/constcirclecenter.html

दिलेल्या बिंदूतून दिलेल्या रेषेवर लंब काढणे :
http://www.mathopenref.com/constperplinepoint.html

दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे :
http://www.mathopenref.com/constparallel.html