सीमा यांचे रंगीबेरंगी पान

आपली पृथ्वी

.allaboutlovebyurvika.jpg
पुनम न टाकलेल्या चित्रावरुन एकदम लक्षात आल कि मला पण बरेच दिवसापासुन उर्विका ने (वय वर्षे साडे पाच) काढलेल चित्र इथ टाकायचय.(Thanks पुनम स्मित )
सध्या तिला शाळेत रिसायकलिंग ,आपल्या पृथ्वीचे कस संरक्षण कराव इत्यादी शिकवत आहेत.
तिला एखादी गोष्ट आवडली तर ती बरेच दिवस ते विसरत नाही आणि तासनतास त्यावर बोलत असते.
आमच्या भागात आम्ही बरच रिसायकलिंग already करतोच. (त्या साठी वेगवेगळे ट्रॅश कॅन पुरवलेले आहेत.)पण घरातही माझ्या पाणी वापरण्यावर तिच नेहमी लक्ष असत. फिदीफिदी

लेट ईट स्नो

या काही कुकिज , हॉलिडे साठी केलेल्या.
शुगर कुकीज, रॉयल आयसिंग वापरुन डेकोरेट केल्या आहेत. कलर्स विल्टन चे वापरलेत.
c2.JPG
c3.JPG
c4.JPG
c1.JPG
c20.JPG

c12.JPG

ट्रिक ऑर ट्रिट. :)

DSC05305.JPG
या वेळी नेहमी प्रमाने pumpkin कार्विंग केलच. पण उर्विका लहान असल्यामुळे चाकु अजुन वापरता येत नाही. म्हणुन मग दुसरा काहीतरी पर्याय शोधत होते. शोधताना potterybarn वर "हॅलोवीन डेकोरेशन " साठी काही तयार सेट दिसले. त्या पासुन inspire होवुन आम्ही हे सेट स्वतःच तयार केले.
हॉबीलॉबी मधुन back side ला स्टिकी सरफेस असलेले फेल्ट मिळतात ते आणले.
साध्या कागदावर अगोदर pattern काढुन घेतला. आणि मग तो फेल्ट च्या मागच्या साईडला काढला.
मुलीने ते सगळे pattern कापले. (काही अवघड भाग मी कापले)