सशल यांचे रंगीबेरंगी पान

पाईन कोन्स

हल्लीच यलोस्टोन नॅशनल पार्कची ट्रिप करून आले .. काही वर्षांपुर्वीच्या मोठ्या वणव्यामुळे पार्कमधला बराच भाग (forestation, पाईन इ. वृक्ष) जळून गेला आहे .. पण निसर्गाची कमाल अशी की वणव्यातल्या उष्णतेमुळे पाईन कोन्स फुटून परत बीजांकुरण झालेलं आहे आणि बर्‍याचशा भागात नविन तरुण पाईनचे वृक्ष दिसून येतात .. तसे पाईन कोन्स मी रहाते तिकडेही खुपच दिसतात पण हे यलोस्टोनमधले आकाराने छोटे वाटले आणि का कोण जाणे जास्त सुंदर वाटले (सुट्टी असल्याने चिंतामुक्त असलेलं मन, वेगवेगळ्या स्वरुपात ठायी ठायी दिसणारा जादूगार निसर्ग ह्यांचा परिणाम असावा स्मित) ..

मैने कहा फुलोंसे ..

मैने कहा फुलोंसे हसो तो वो खिलखिलाके हस दिये .. स्मित

Flowers 2.JPG

Flowers 3.JPG

Flowers 4.JPG

Flowers 1.JPG

नुकत्याच केलेल्या यलोस्टोन आणि ग्रँड टिटॉन नॅशनल पार्क्स मध्ये दिसलेली काही फुलं ..

वाळवण, साठवण - एक मजेदार आठवण!

मिनोती च्या ह्या लेखामुळे माझ्या लहानपणच्या आठवणीही अगदी उफाळून आल्या .. उन्हाळातल्या सुट्टीत केलेल्या गोष्टींमध्ये ह्या वाळवण, साठवणींशी निगडीत आठवणी पहिल्या पाचांत असतील बहुदा ..

आमीर खानचा आकाश मल्होत्रा vs. रँचो उर्फ फुनसुख वांगडू

परवा सहज कुठल्यातरी संभाषणात आमीर खानच्या 'दिल चाहता है' आणि 'थ्री इडियट्स' मधल्या रोल्स ची तूलना केली गेली .. तर असा एक पोल घ्यावा असं वाटलं .. (हा प्रश्न 'प्रश्न' मध्ये विचारला तर चालेल का?)

आमीर खानचा कुठला रोल तुम्हाला जास्त आवडतो?

'दिल चाहता है' मधला आकाश की 'थ्री इडियट्स' मधला रँचो उर्फ फुनसुख वांगडू?

(बरेच लोक थ्री इडियट्स मधला रँचो असं 'अकॅडेमीक' उत्तर देतील असं वाटतंय तर दुसरा प्रश्न आहे की ) ह्यापैकी कुठलं कॅरॅक्टर मुलींनां जास्त आवडेल असं तुम्हाला वाटतं?

(दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्या शक्य असेल तर .. स्मित)

प्रश्न

कितीतरी लोकं (माझ्यासारखी) स्वच्छंदी असतात बोलण्याच्या बाबतीत .. मनात येईल ते बोलून टाकतात पटकन मग ईतरांकडून (नवरे टाईप कायम उपदेश करणारे लोक) ऐकून घ्यायला लागतं की, "विचार करून बोलत जा!"

डीसी महागटग वृत्तांत - नविन अचूक किनार्‍यावरून

सप्रेम नमस्कार!

येणार
येणार
लवकरच येणार
अचूक किनार्‍यावरचा विशेष वृत्तांत लवकरच येणार!

वाट बघा!
हुकूमावर्नं ..

माफिया

तीन-चार वर्षांपुर्वी एका न्यु ईयर पार्टीला कोणीतरी हा खेळ शिकवला .. सुरुवातीला काहीच कळलं नाही पण हळू हळू इतका आवडला की दर वेळी खेळायला आणखी मजा येते .. तर माफिया कसा खेळायचा त्याचं सध्याचं आमचं 'working' version द्यायचा प्रयत्न करतेय ..

अजून फोटो

या वीकेन्ड ला Cherry picking ला गेलो होतो तेव्हा काढलेले हे दोन फोटो ..

1. Red Cherry

Cherry_1.jpg

2. White cherries

Cherry_2.jpg

माझी photography

मला फार काही कळत नाही photography तलं .. पण 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या' सारखं नवर्‍याची photography बघून मलाही क्लिक करायची हुक्की येते .. तसे हे काही फोटो .. माझ्या नवर्‍याकडे Nikon D200 आहे या व्यतिरिक्त मला काहिही कळत नाही ..

यंदाच्या भारतवारीतले काही फोटोज्

माझ्या नवर्‍याने घेतलेले काहि फोटोज् ..

१. दिवाळी फराळ

Ind2.jpg

२. पाडव्याचा मेनू स्मित

Ind1.jpg

३. कंदिल

Ind6.jpg

४. गणपतिपुळे

Ind3.jpg