रूनी पॉटर यांचे रंगीबेरंगी पान

माझे मातीचे प्रयोग - ५ (Crystalline glazes continued)

समर सेमिस्टर मध्ये जे क्रिस्टलाइन ग्लेझेस बद्दल काम करायला आम्हाला शिकवले तेच या फॉल सेम मध्ये स्वतःहून पुढे चालू ठेवायचे असे मी ठरवले होते. खर तर हे इतके जास्त वेळखाऊ काम होते की क्लास करतांना मी परत हे कधी करायला घेईन असे वाटले नव्हते. खर तर I never realized that I was actually addicted to crystalline glazes.
फॉल सेम मध्ये मी खर तर पाण्याचे जग/ चहाची किटली इ. (pouring vessels) क्लासमध्ये नाव घातले होते. ह्या क्लासच्या सगळ्या असाइनमेंट्स पूर्ण केल्यावर उरलेल्या वेळात क्रिस्टलाइन ग्लेझ करायचे असतील तर परवानगी मिळेल असे सरांनी सांगितले.

माझे मातीचे प्रयोग ४- Crystalline Glaze

पॉटरी क्लास मध्ये अर्धे सेमिस्टर संपत आले की मग सर पुढच्या सेमिस्टरमध्ये त्यांचा काय शिकवायचा विचार आहे हे जाहीर करतात. यावेळी त्यांनी जाहीर केले Crystalline Glaze.
ते ऐकल्यावर काहींनी आनंदाने उड्या मारल्या, काहींनी ओ नोऽऽ असा उसासा सोडला आणि आमच्यासारख्या मातीकामात थोड्या नवख्या थोड्या रुळलेल्या लोकांच्या चेहर्‍यावर हे नक्की काय आहे, मुख्य म्हणजे यासाठी prerequisites काय हा प्रश्न उभा राहिला. या आधी सुमारे ४ वर्षापूर्वी हा कोर्स शिकवला गेला होता त्यानंतर इतक्या वर्षांनी सरांनी परत हा कोर्स शिकवायची तयारी दाखवली होती (असे का याचे कारण पुढे येईलच)

NCECA मातीकामाच्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने

जानेवारीत कॉलेजच्या सिरॅमिक स्टुडीओमध्ये एनसिका (NCECA - National Council on Education for the Ceramic Arts) कॉन्फरन्सचे पत्रक नोटीसबोर्डवर लागले. नजदिकच्या काळात होणार्‍या वर्कशॉप, आर्ट शोज् यांची पत्रकं नेहमीच तिथे लागत असतात. त्यावर एक नजर टाकायची, हे सगळे महागडे प्रकार आपल्यासाठी नाहीत असे म्हणून खांदे उडवायचे आणि कामाला जायचे हा सगळ्यांचा नेहमीचा रिवाज. यावेळीही दुसरे काही केले नाही.

माझी दिवाळीची तयारी झाली, तुमची?

यावेळी दिवाळीची तयारी थोडी लवकर सुरू केली होती.
गणपतीच्या वेळी पणत्या चाकावर करणे, त्यांना हवा तसा आकार देणे, त्या वाळवणे, वाळल्यावर भट्टीत भाजणे. भाजून आल्यावर मग घरभर रंगाचा पसारा मांडून हवी तशी मनसोक्त रंगरंगोटी करणे. असे सगळे केल्यावर मग मायबोलीच्या शोनूकडच्या गेटटुगेदरला त्या घेवून जाणे, सगळ्यांना पणत्या विकत घ्या असा आग्रह करणे, आणि त्यांनी पण काही न म्हणता प्रेमाने पणत्या घेणे हे सगळे फक्त मायबोलीमुळेच शक्य आहे.
असा सगळा द्राविडी प्राणायाम केल्यावरचे हे काही फोटो.

१. DiwaliPantyaMB10.JPG

माझे मातीचे प्रयोग ३

पॉटरीच्या क्लासला जायला लागल्यापासून सगळ्यांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागलेले असायचे आपल्याला चाकावर कधी भांडी करायला मिळणार. एक संपूर्ण सत्रभर फक्त हाताने मातीकाम (हॅन्ड बिल्डींग) केल्यावर मग दुसर्‍या सत्रात आम्हाला चाकाला हात लावायची परवानगी मिळाली. तेव्हा हॅन्ड बिल्डींग करणार्‍या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक प्रकारची अधिरता दिसत होती तर आधीपासून चाकावर काम करणार्‍यांच्या चेहर्‍यावर एक स्मितहास्य. त्या स्मितहास्याचा अर्थ आम्हाला नंतर कळला.

|| शुभ दिपावली ||

सगळ्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी यावर्षीच्या दिवाळीची तयारी १ महिन्याआधीच चाकावर पणत्या करण्यापासून झाली. मग त्या पणत्या वाळवुन, भट्टीतुन भाजून आणल्या आणि घरी रंगवल्या. चाकावर मातीकाम करायला लागुन फार दिवस झाले नाहीत आणि पणत्या पहिल्यांदाच करत होते त्यामुळे विश्वास नव्हता की खरच बनवता येतील की नाही ते, आता पुढच्यावर्षी अजून जास्त बनवेन.

panati2.JPG

Panati1.JPG

पॉम्पे-एर्कोलानो-व्हेसुविओ

मागच्या महिन्यात ३ आठवडे इटलीला गेलो होतो. तिथल्या भेट दिलेल्या आणि आवडलेल्या काही ठिकाणांविषयी -

आय वॉज देअर!!!!

I-Was-There.jpg

अमेरीकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी समारंभ आणि मिरवणुक क्षणचित्रे.

President-Approaching.jpg

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा.

The Boy in the Striped Pajamas

नुकतेच John Boyne यांचे The Boy in the Striped Pajamas हे पुस्तक वाचुन संपवले. ह्या लेखकाबद्दल मला आधी काहीच माहित नव्हते. एका स्पेनच्या मैत्रीणीने वाचायला सांगितले म्हणुन वाचायला घेतले. हे पुस्तक मागच्यावर्षी स्पेन मध्ये बेस्ट सेलर होते.

श्रीगणेशा - विजयादशमीच्या शुभेच्छा!!

dasara.jpg

नमस्कार,
सगळ्यांचे या रंगीबेरंगीच्या पानावर स्वागत आहे.
मायबोलीच्या गणेशोत्सवात यंदा हातभार लावल्याबद्दल मायबोलीने प्रेमाने ही रंगीबेरंगीची भेट देवुन सुखद धक्का दिला स्मित.