बखर

February 8th, 2012

ओळखा पाहू, खरे काय?

माध्यम : ग्रॅफाईट आणि चारकोल पेन्सिल.
माझा पहिला 'trompe l'oeil' प्रयत्न. येथे काहिही 'डकवलेले' नाही.
गुलाबाचे प्रकाशचित्र भालचंद्रकाकांचे : http://www.maayboli.com/node/32340 येथे पहा.

IMG_2624.JPGIMG_2628.JPG

उघड उघड बये

उघड उघड बये
आता तरी उघड
माजघराचे दार ..थोडे थोडे उघड

आकाशाच्या कह्यात
सूप टोपले पाखड
चांदण्याच्या नजरेत हळू हळू येशील
नजरेतलं चादणं वळून वळू्न घेशील

अंगणातली तूळशी्पाशी
गूज थोड उकल ,मातीच्या चुलीजवळ
जसा जन्म सफ़ल
जरा जरा धकल,तुकडा पाणी खपल

उघड उघड बये
आता तरी उघड
माजघराचे दार ..थोडे थोडे उघड

कासवाच्या गतीनं रस्ता तूझा दिसल
टाचा ऊंच करुन ,मन कर अचल
एक एक धागा आता तू उकल

शब्दांच्या विहिरीत ,जीव नाही जायचा
एक एक जाणिवाचा तळ मात्र गाठायचा
चक्र तर रोजचेच चुल आणि मुल
तू नको विसरु गं तूझे उगम कूळ

्बर, आता जूळवून घे चैत्यन्याशी सूत

'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' परिसंवाद विशेषांक - घोषणा २

0

'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओ़ळख(आयडेन्टिटी)-' परिसंवाद विशेषांक

साक्षात्कार

ऐकली माझी व्यथा, वरवर दिला आधार त्यांनी
आणि नंतर त्या व्यथेचा मांडला बाजार त्यांनी

सोबतीला मी स्वतःची सावली नेईन म्हणतो
छाटले आहेत सारे वृक्ष डेरेदार त्यांनी

राहत्या वस्तीत माझा छान पाहुणचार झाला
धाडली आमंत्रणे अन् बंद केले दार त्यांनी

आज माझे गीत इतके भावले नसते तुम्हाला
छेडली नसती कधी जर वेदनेची तार त्यांनी

आतमध्ये साचलेले कागदावर मांडले मी
ते कुठे कळले? जरी केली समीक्षा फार त्यांनी

साठले होते तरीही नितळ आणि निखळ होते
डोह करुनी टाकला माझ्या मनाचा पार त्यांनी

शब्द माझ्याशीच माझे वागले परक्याप्रमाणे
बोललो आभार, माझे मानले आभार त्यांनी!

Luwan of Brida - सारंग महाजन

सारंग महाजन हा माझ्या धाकट्या भावाचा मित्र. त्याच्या हॅरी पॉटर आणि लॉर्ड ऑफ रिंग्ज प्रेमामूळे आमचं बरं जमायचं. हॅपॉ सिरीजमधलं पुस्तक बाजारात आलं की याच्या हातात आणि नंतर एक-दोन दिवसात त्याच्याकडून माझ्या हातात यायचं. माझ्या लग्नाची इ पत्रिका याने मला बनवून दिली होती.

भावाबरोबर बीएससी करून नंतर एमबीए ( ??) झालेला हा पोरगा. नोकरीच्या भानगडीत न पडता याने वेब पेज डिझायनींग सुरु केलं. सारंग काय करतोय याचं उत्तर दर काही दिवसांनी बदलायचं. वेब पेज डिझायनींग /मेन्टेनंस चालू होतंच. सोबत जीम, फोटोग्राफी, भटकंती, वाचन, लिखाणही चालू होतं.

February 7th

ओल्या हळदीचे लोणचे ( फोटो सहित )

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/४ किलो ओली हळद, त्याच्या निम्मी आंबे हळद ( मिळाल्यास ), ४-५ हिरव्या मिरच्या, ८-९ लिंबू,
४ ईंच आल्याचा तुकडा, १ चमचा लोणच्याचा मसाला, १ चमचा तिखट, फोडणीचे साहित्य, ( हिंग, मोहरी
व २ चमचे तेल ) अंदाजे मीठ.

क्रमवार पाककृती: 

१/४ किलो ओली हळद आणावी. आंबे हळद पण कधी कधी बाजारात मिळते. ती पण अर्धा पाव आणावी.
दोन्ही स्वछ धूवुन एकतर त्याचे बारीक तुकडे करावेत किंवा किसुन घ्यावी. मी ओ. हळद किसुन घेतली.आंबे हळ्द मला मिळाली नाही. हात एकदम पिवळे पिवळे होतात. स्मित
मग आले पण किसुन घ्यावे. ४ लिंबु कापुन त्याच्या बारीक बारीक फोडी कराव्यात. मिरच्या पण बार्रीक चिरुन घ्याव्यात. उरलेले ४-५ लिंबु घेऊन त्याचा रस घ्यावा. हे सगळे मिक्स करून त्यात १ चमचा लोणच्याचा मसाला घालावा. नसल्यास १ चमचा तिखट घालावे. व नंतर नेहमीसारखी फोडणी तयार करून ( हिंग, मोहरी ) घालुन गार झाल्यावर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
थोडे थोडे लागते.
अधिक टिपा: 

हे लोणचे काही दिवस मुरवत ठेवावे. मगच ते खुप मस्त लागते. वेगळ्या चवीचे असे हे लोणचे आहे.
दिसायला पण केशरी रंगाचे ,रंगीबेरंगी असे दिसते.

माहितीचा स्रोत: 
एक स्नेही.

वाघाची मावशी

वाघाची मावशी......

वाघाची मावशी मनीमाऊ छान
सिप स्पिप करताच टवकारी कान

शांपूबिंपू काही नको, तरी किती स्वच्छ
चाटून चाटून स्वतःला ठेवते अगदी लख्ख

म्याँव म्याँव करत घोटाळते पायात
लाड करुन घेते मावशी ही अचाट

टॉमी समोर येताच गुरकते केवढी
केस फुलवून म्हणते मी तर तुझ्याएवढी.......

पिकनिक

जागतिक महिला दिनानिमित्त सोसायटीची पिकनिक मी arrange करतेय, तेव्हा आपल्याला कोणाला महिलांसाठी पिकनिक मध्ये खेळता येणारे खेळ माहिती असल्यास जरुर कळवावेत.

असं एखादं पाखरू वेल्हाळ . . . .

शनिवारी मायबोलीकर आशुतोष, इंद्रधनुष्य, ललिता, स_सा, कांदेपोहे यांच्या बरोबर "भिगवण" येथे पक्षी निरीक्षणाला जाण्याचा योग आला. या सार्‍यांच्या सोबत बर्‍याच नवीन पक्ष्यांची माहिती/नावे समजली. यातील कित्येक पक्षी तर मी पहिल्यांदाच पाहत होतो. स्मित
फोटो तितकेसे खास नाही आलेत, म्हणुन हे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करणारच नव्हतो स्मित, पण काही माबोकरांच्या आग्रहास्तव हा चित्रप्रपंच. स्मित.
या सर्व पक्ष्यांना प्रत्यक्ष पाहणे वर्णनातीत आहे. Rudy Shelduck, Stork आणि Purple Moorhen यांना प्रत्यक्ष उडताना बघणे हा एक जबरदस्त अनुभव आहे. पक्षी निरीक्षणाची आवड असेल तर हा भाग Must Watch!!!! स्मित

प्रचि ०१