बखर - साहित्य लेखन

May 23rd, 2012

अरे, फुलांचा सुगंधही मी दुरून घेतो!

गझल
अरे, फुलांचा सुगंधही मी दुरून घेतो!
अलीकडे मी, ऋतू ऋतू पारखून घेतो!!

कशास मी आर्जवे करावी तुझी वसंता?
हरेक मी श्वास केवढा मोहरून घेतो!

असे नव्हे की, इजा व्यथांनीच फक्त केल्या;
सुखासही आजकाल मी पाखडून घेतो!

मला करावेच लागते वज्र काळजाचे;
हरेक माणूस आयुधे पाजळून घेतो!

नवीन नाही मला असे बेचिराख होणे;
अलीकडे रोज मी मला सावडून घेतो!

उगाच सोन्यासमान येते न ओळ ओठी;
मनात एकेक शब्द मी पालखून घेतो!

-------प्रा.सतीश देवपूरकर

May 22nd

मॅगपाई रॉबीन

काही दिवसांपूर्वी घरातून टिपलेला हा मॅगपाई रॉबीन.
================================================================================

उटीची ब्यूटी

आम्ही फ्रेब्रुवारीत उटीला गेलो होतो. फेब्रुवारीतही मस्त थंडी होती. तिथले काही फोटो.
मॉर्निंग वॉक...

DSCN1322_0.JPG

जागोजागी दिसणारे हिरवे गार चहाचे मळे

DSCN1324_0.JPG

हॉटेल रूम मधून दिसणारे दृश्य.

DSCN1325_0.JPG

पुन्हा गवसलो होतो

खरे सांगतो माझ्यापासुन मीच हरवलो होतो
डोळ्यामध्ये तुझ्या पाहता पुन्हा गवसलो होतो

आस तुझी सोडून दिली मी सर्व संपले होते
वळून तू बघता जातांना मी मोहरलो होतो

आज अचानक कबरीवरती दिवा लावला तू अन्
प्रेम कळाले मरणानंतर तरी बहरलो होतो

एक कवडसा जगण्यासाठी मला पुरेसा होता
तो मावळता अंधारी मी मुकाट निजलो होतो

असंख्य कोल्हे, नभी गिधाडे, आप्त भोवती असता
जगणार्‍याने कसे जगावे? मी गांगरलो होतो

देव म्हणे "कैदेत राहिलो धूर्त पुजार्‍यांच्या,
सोडुन गेलो मंदिर जेथे मी गुदमरलो होतो"

किती फाटका प्रपंच माझा! लोक सुदामा म्हणती
कधी न झाली कृष्णकृपा, पण मी सावरलो होतो

मन मांडते खेळ ……

मन मांडते खेळ, त्यात त्याचेच नियम!
हरते कधी चुकुन, पण जिंकते कायम!
मनच रुसते, मनच मनवते!
मनाच्या वेडेपणाला, मनच हसते
मन करते तक्रार, मनच फिर्यादी!
चुक नाही माझी, पण मीच आरोपी!
मनच समजावते, तेच न्याय करते!
आनंदी राहण्याची शिक्षा सुनावते!
मन कधी रडते, आसुही तेच पुसते!
हसऱ्या गालावर, दुखाःची खळी पडते!
मन स्वच्छंदी, मन लहरी!
मन मिणमिणणारी पणती!
मन सुरेल, मन सुरेख!
मन झरझर वाहणारी नदी!
मन दिसते कसे? मन असते कसे?
हे नेहमीच बिचारे फसते कसे?
मनाच्या प्रश्नांना, द्यावे उत्तर मनानेच!
उलगडा होऊपर्यत, जगावे मुक्त मनाने!

mukti.

वळीव

उन्हाळा आणि विरह यातलं नेमकं साम्य काय?
उन्हाळ्यानंतर वळीव अंगणात बरसताना दिसतो
आणि याच वर्षावात चिंब झालेला
सजण दारी उभा असतो ! ! !...........

गुलमोहर

गुलमोहराच्या पाकळ्यांनी सजलेल्या पायवाटेवरून पुढे गेलं की तुझं घर येतं,
तीव्र उन्हाळे भोगलेलं माझं मन मग तिथे अलगद विसावतं........

काय पुरावा हवा तुम्हाला माझ्या बैल असण्याचा

जनावरांची छावणी सुरू झाली अन्‌ माणसं राहायला आली...
वर्षा कुलकर्णी - सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, May 07, 2012 AT 01:30 AM (IST)
पुणे - जनावरांची छावणी सुरू झाली आणि लगोलग एका रात्रीत तिथे माणसं राहायला आली. जनावरांना मिळणारं पाणीच माणसं पितात. तिथेच दगड मांडून दोन घास रांधतात आणि जनावरांना वाचवताना आपणही उभे राहिलो, असं समाधान मानण्याची वेळ माणदेशी बाया-माणसांवर आली आहे. माण तालुक्‍यातील म्हसवड येथे जनावरांसाठी पहिली छावणी चेतना सिन्हा यांच्या माणदेशी फाउंडेशनने सुरू केली आहे.
दै. सकाळमधील वरील बातमीवरुन सुचलेली ही कविता.

अंतरंग

येथ रिकाम्या हाती येसी, जाशी रिक्त या हाती तू
दोन रिक्तांमधली जागा, व्यापूनी टाक पुरुषार्थे तू
जगरहाटीने स्मित खुलो परि, दुःख गिळावे मनोमनी
हसवूनी जगां सवे हसुनी, गंध पसरो दश दिशांतुनी ॥

मिथ्या, नश्वर जग भवसागर, भार तयाचा पित्यांवरी
मनी वासना, चित्ती तृष्णा, नाम लटके मुखावरी
लोभ सुटेना, ज्ञान पटेना, होई स्थिती त्रिशंकु परी
भोगास मिती अन जीवन निष्ठा, बोध तुज हा खरोखरी ॥

घरात साऱ्या सुगंध पसरवी, पारिजात तू होऊनीया
कष्टांची जर होता वृष्टी, सोस पाषाण होऊनीया
भाग्य तुझे जर होसी तू, त्या तृण आणि फळापरी
सर्वांसाठी होऊन जा तू, कशापरी अन कशापरी ॥

आभास हा

आभास हा

चंदू चं आयुष्य तसं एककल्लीच! सकाळी उठावं , चहा घेवून बाईकला किक मारावी , गल्लीतल्या किराणा मालाच्या दुकानातून १० गुटख्या च्या पुड्या घ्याव्यात ,एक तिथेच फोडून तोंडात टाकावी ,आणि दिवसाचा शुभारंभ करावा ! मग थोडं चावडीवर भटकून इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्यात आणि बातम्या काढाव्यात. आणि मग सरळ घर गाठावं. अंघोळ-पूजा उरकून आईने दिलेला डबा घेवून मग कंपनी गाठावी....