ही अशी आधी झाडावर लटकलेली कच्ची भोकरे काढून घ्या. 

* भोकरे व कैरी स्वच्छ धुवून पुसुन घ्यावीत. आता कैरीच्या फोडी कराव्यात. भोकरांचे सुरीने कापून दोन भाग करा.
हे मला शिंपल्यातल्या मोत्यासारख वाटत आहे
(कैच्याकै, मला काय वाटेल त्याचा भरवसा नाही
)

* एका भागातली बी काढून टाका. हे खुप किचकट काम आहे. कारण बी इतकी चिकट असते. की आपली बोटे चिकट होतात. पण आपल्यामध्ये चिकाटी असू द्या. 

आता हात धुवताना कसोटी असते. २-३ वेळा साबण लावून हात धुतल्यावर एकदाचा चिकटपणा जातो.
मसाला तयार करायला घ्या. १ चमचा तेलावर मेथी तळून घ्या. गार करा व मिक्सरमध्ये पुड करा. मस्त वास येतो. (ही खटपट करायची नसेल तर सरळ मेथी पूड आणा पण चवीत थोडा फरक पडतो.)
आता मोहरीची डाळ सोडून बाकीचे जिन्नस म्हणजे हळद, मिठ, मिरची पूड हिंग एकत्र करा.
फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा चांगले गरम झाले की गॅस बंद करून भांडे खाली उतरवा आणि मग त्यात मोहरीची डाळ टाका म्हणजे ती जळणार नाही.

ही फोडणी थंड होऊ द्या. एकत्र केलेला मसाला आणि फोडणी एकत्र करून घ्या.

हा मसाला फिडींमध्ये चांगला मिसळा.

एका काचेच्या बरणीत हे लोणचे भरून ठेवा. जास्त दिवस ठेवायचे असेल तर अजुन १-२ पळ्या तेल गरम करून फोडी बुडे पर्यंत बरणीत ओता म्हणजे बुरशी चढत नाही.

हेहे झाले लोणचे तयार ७-८ दिवसांनी मुरेल मग खायला घ्या.
