बखर - कार्यक्रम

May 15th, 2012

चलो एल.ए. !

तारीख/वेळ: 
14 July, 2012 - 13:10 - 15 July, 2012 - 21:10
ठिकाण/पत्ता: 
मेगा गटग विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा उघडला आहे. सध्या जनमतानुसार १४-१५ जुलै ही तारीख ठरते आहे. ह्या वेळी गटग एल.ए. मधे असेल. गटग ला उपस्थित राहण्यासाठई सर्व मायबोलीकरांना सस्नेह आमंत्रण. आपली उपस्थिती इथे नोंदवा.
माहितीचा स्रोत: 
मायबोली

May 2nd

समीर सरवटे यांना भेटण्यासाठी मुंबई गटग

तारीख/वेळ: 
6 May, 2012 - 01:30 - 03:00
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल सूरज व्हेज ट्रिट, राम मारुती रोड, बेडेकर हॉस्पिटलजवळ, लॅक्मे सलोनसमोर, ठाणे (पश्चिम)

April 4th

पुण्यात मायबोलीकरांशी भेट

तारीख/वेळ: 
21 April, 2012 - 09:00 - 12:00
ठिकाण/पत्ता: 
सध्या तरी मल्टिस्पाईस. 46/2, Opp Siddhi Gardens, Off Mhatre Bridge, Karve Nagar, Pune - 411052

****
मी २१ एप्रीलला पुण्यात असणार आहे. तेव्हा संध्याकाळी मायबोलीकरांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला ही तारीख्/वेळ जमत असेल तर या धाग्यावर कृपया नाव नोंदणी करा.

March 30th

रा रा उन्हाळी गटग - मे महिना २०१२

तारीख/वेळ: 
19 May, 2012 - 14:49
ठिकाण/पत्ता: 
कधी? :- १२ मे / १९ मे (ज्या तारखेला जास्त उपस्थिती असेल ती)

कुठे? :- आत्ताच हाती आलेल्या बातमी नुसार ठिकाण नक्की झालेलं आहे-- अर्पणाचं घर-- बेसिंगस्टोक (Basingstoke)
डिटेल पत्ता येणार्‍यांना मेल करून कळवण्यात येईलच.

March 29th

२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

तारीख/वेळ: 
12 May, 2012 - 14:00 - 20:00
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत

February 24th

३ मार्च २०१२ - मुंबई गटग - विनय देसाई

तारीख/वेळ: 
3 March, 2012 - 06:00
ठिकाण/पत्ता: 
गणेश उद्यान, शिवाजी पार्क, दादर

.
.
मंडळीनू,

आपले हे मा अर्थात विनय देसाई हे भारत दौर्‍यार ईलेत.
सध्या कुडाळाक आसत पण १ तारखेपर्यंत मुंबैत येतले. आणि पुन्हा चार तारखेक माघारा जातले तेव्हा ३ तारीख शनिवारचो मुहूर्त साधून त्येंच्या भेटीचो गटग संपन्न करुया. स्मित

एक तर विनयदादांची रविवारी जावची लगबग आसतली आणि काही लोकांका रविवार असो 'फुकट' घालवूक आवाडणा नाय. डोळा मारा शिवाय रेल्वेचे मेगाब्लॉक वगैरे यामुळे येवचे वगीच वांदे नको म्हणून शनिवार मुद्दाम धरलो हा.

तेव्हा येवक लागा.
वायच तेव्हढी नोंदणी करा पयली स्मित

February 14th

सस्नेह निमंत्रण - मुशाफिरी - उदघाटनाचा मुशायरा

तारीख/वेळ: 
24 February, 2012 - 08:00 - 11:00
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल रामा हेरीटेज, कालिका मंदीराशेजारी, महामार्ग बस स्थानकाजवळ, जुना आग्रा रोड, नाशिक.(कार्यक्रमाचे ठिकाण महामार्ग, सी.बी.एस. आणि द्वारका ह्या ठिकाणांवरून सहज सापडेल असे आहे व कालिका मंदीर हे नाशिकच्या ग्रामदेवतेचे मंदीर असल्याने सर्वांना ज्ञात आहे.) ============================================================================

=========================================================================
मुशाफिरी ह्या संकल्पनेचा उदय, त्यामागची प्रेरणा आणि मार्गक्रमणाची दिशा ह्याचा अंदाज येण्यासाठी हे जरूर वाचावेत मुशाफिरी-प्रवास गझलेच्या अंतरंगाकडे

सप्रेम नमस्कार,

मूल चालण्यासाठी पहिले पाऊल टाकते तेव्हा आईला किती आनंद होत असावा?

पहिल्यांदाच प्रवासाला निघताना पहिले पाऊल टाकताना होणारा आनंद तितकाच अवर्णनीय असतो ह्याचा प्रत्यय आज मला हा लेख लिहीताना येतो आहे.

January 10th

दिनेशदा - निसर्ग गटग - २२ जानेवारी - महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहिम.

तारीख/वेळ: 
21 January, 2012 - 22:30 - 22 January, 2012 - 02:30
ठिकाण/पत्ता: 
माहिमचे महाराष्ट्र निसर्ग उद्यान

आपल्या सगळ्यांचे आवडते व्यक्तीमत्व श्री. दिनेशदा यांचे मुंबईत आगमन झाले आहे.

या भेटीदरम्यान मायबोलीकरांना आणि विशेषतः निसर्गाच्या पारावर गप्पा ठोकणा-यांना भेटायला ते उत्सुक आहेत. (जिस्प्याच्या प्रदर्शनात काही मायबोलीकरांना त्यांनी आधीच दर्शनाचा लाभ दिलाय ते वेगळे स्मित )

कोणाच्या घरी भेटण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटणे सगळ्यांना सोईचे पडेल असा विचार करुन यावेळी माहिमचे "महाराष्ट्र निसर्ग उद्यान" हे ठिकाण निवडले आहे.

तारिख : २२ जानेवारी २०१२
वेळ : सकाळी ९ ला गेटभेट.

January 6th

"रानवाटा" प्रदर्शनाला भेट देणार्‍या माबोकरांचे गटग

तारीख/वेळ: 
8 January, 2012 - 07:30 - 09:30
ठिकाण/पत्ता: 
ठाणे कलाभवन केंद्र बिग बझार शेजारी, कापूरबावडी, ठाणे (पश्चिम).

जिप्सी उर्फ योगेश जगताप (डोळा मारा) याच्यासह अनेक गुणवान छायाचित्रकारांच्या छायाचित्र-प्रदर्शनाबद्दल आपण
http://www.maayboli.com/node/31707 इथे वाचले आहेच.

त्या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांवरून बरेच माबोकर हजेरी लावणार असल्याचे दिसले.
प्रदर्शनाची वेळ खालीलप्रमाणे असली तरी आपण सर्वांनी प्रतिसादांत लिहिल्यानुसार - रविवार, ८ जाने, संध्याकाळी ६ वाजता भेटूया.

दिनांकः
शनिवार ७ जानेवारी आणि रविवार ८ जानेवारी, २०१२.
वेळः
सकाळी ११ ते रात्रौ ८ पर्यंत

१. अजून कुणाला यात काही भर घालायची असल्यास नक्की लिहा.

January 3rd

पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट (गेटटुगेदर) १४ जानेवारी, २०१२ सायं ६.३० भक्तिशक्ति उद्यानाजवळ

तारीख/वेळ: 
14 January, 2012 - 08:00 - 10:30
ठिकाण/पत्ता: 
पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट दिनांक १४ जानेवारी, २०१२ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.०० दरम्यान भक्तिशक्ति उद्यानाजवळ ठरविली आहे. सर्वान्नी अगत्य येण्याचे करावे ही नम्र विनंती. दिनांक : १४ जानेवारी, २०१२ वेळ : सायंकाळी ६.३० ते ९.०० स्थळ : भक्तिशक्ति उद्यानाजवळ साडेसहा ते सात दरम्यान भक्तिशक्तिच्या गुगलम्यापवरुन घेतलेल्या पुढील फोटोमधे बरोब्बर मध्यामधे लाल फुलीसहित जो पांढरा गोल दाखविला आहे, त्या कोपर्‍यापाशी सर्वांची वाट बघणेत येईल, व ७ नंतर जमलेले लोक पुढील कार्यक्रम ठरवतील

.
फलितः
ही भेट ठरविल्याप्रमाणे सम्पन्न झाली / पार पडली. याचा वृत्तान्त पुढिल लिन्क्स वर आहे.
१) http://www.maayboli.com/node/31953#new

माहितीचा स्रोत: 
पिंपरी-चिंचवड हा धागा http://www.maayboli.com/node/1897#comment-1805977 - येथिल सभासदांचे निर्णयानुसार