बखर - पुस्तकातलं पान

December 15th

मायबोलीवर शोधसुविधा कुठे सापडेल

मायबोलीवर प्रत्येक पानावर दोन ठिकाणी शोधसुविधा आहे.

१. सर्वात शेवटी
'First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996' या ओळींच्याखाली 'सर्च'साठी असलेली खिडकी आहे.
त्यात लिहून ’एंटर’ दाबले असता शोधनिकाल दिसतील.



२. जाहिरातींच्या खाली:



October 5th

फुलोंकी घाटी, हेमकुंड

गेली चार तरी वर्षे मी नित्यनेमाने घाटीच्या ट्रेक्सच्या जाहिराती चवीने पाहते. या(ही)वर्षी न जमण्याची काही ना काही तजवीज लहान मूल, पावसाळी आजारपण, नोकरी, तब्येत, सुट्ट्या, खर्च, कंटाळा, भीती, inertia यातील एक किंवा सर्व घटक आपसूक करतात. यावर्षी कसे कोण जाणे, बर्‍याच प्रापंचिक अडचणी येऊनही, जमलेच. हाच एक मोठ्ठा धक्का. तो पचवून तयारीला लागले.

August 1st

मला खात्री आहे

"मला खात्री आहे" या कथेचे सर्व भाग इथे एकत्र वाचा.

July 20th

पाककृती लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा

"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्ही प्रकाशचित्रे साठवू शकता.

पाककृती लिहिताना मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" हा पर्याय दिसत नाही. तेव्हा, प्रतिसादाच्या खिडकीत जाऊन "मजकुरात image किंवा link द्या" हा दुवा आहे त्यात "image" या पर्यायावर टिचकी मारा.

1st.JPG

उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा. तुमच्या मजकुराच्या खिडकीत Image tag येईल.

July 6th

प्रतिसादापुढे "संपादन" का दिसते?

प्रत्येकाला आपापल्या पोस्टी संपादित करायचा पर्याय दिसतो. इतरांच्या पोस्टीपुढे हा पर्याय दिसू शकत नाही कारण इतरांच्या पोस्टी संपादित करण्याचा अधिकार फक्त प्रशासकांकडे आहे. संपादनाचा दुवा वापरून आपण आपली पोस्ट बदलू शकता, अथवा लिहीलेला प्रतिसाद पुसून त्याऐवजी बदलीचा मजकूर लिहू शकता.

प्रतिसाद रिकामा ठेवल्यास

प्रतिसाद field is required.

अशा प्रकारे चूकदर्शक संदेश येतो.

June 20th

सिनेमा आणि संस्कृती

सिनेमा आणि समाजाच्या संदर्भात 'आरसा-प्रतिबिंब' वाद सनातन आहे. अगदी जेव्हांपासून सिनेमा बनायला लागले तेव्हापासूनच. मात्र यापैकी कोण आरसा आणि कोण प्रतिबिंब या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत ना कोणी समाजशास्त्रज्ञ अचूकपणे देऊ शकला आहे ना कोणी सिनेअभ्यासक. कारण ते तसे कोणा एकाच्या बाजूने देता येण्यासरखे नाहीच मुळात.

June 5th

सुट्टीतले उद्योग

"आई गं, कंटाळा आलाय घरात बसुन... बाहेर जाऊ का खेळायला??"

"अजिब्बात नाही... रणरणत्या उन्हात बाहेर जायचं नाही... जा पुस्तक वाच, नाहीतर टीव्ही बघ थोडावेळं"

वार्षीक परीक्षा संपुन उन्हाळ्याची सुट्टी लागली की घरोघरी होणारा हा आई आणि मुलांमधला कॉमन संवाद. बच्चे कंपनीला स्पेशली लहान मुलांना सुट्टीत बिझी कसे ठेवायचे हा आई-वडिलांना नेहमी पडलेला प्रश्न. सध्या माझ्याही लेकीला टर्म एंड म्हणुन २ आठवडे सुट्टी आहे. त्यामुळे तिला बिझी ठेवणे हे माझ्यापुढेही एक चॅलेंजच आहे.

आमचें गोंय

January 13th

मायबोलीवरील विभागांची थोडक्यात ओळख

मायबोलीवर असलेल्या वेगवेगळ्या विभागांची थोडक्यात ओळख ही इथे आहे.
मायबोली सदस्यत्व घेतल्यावर मिळणार्‍या सुविधांची थोडक्यात ओळखही त्यात समाविष्ट आहे.

December 29th, 2010

चायना पोस्ट

चीनमधे सलग काही महिने राहून आल्यावर अनेकांनी तु 'हे' बघीतलस कां? 'ते' बघीतलस का? असे प्रश्न विचारले. विशेषतः पर्यटन कंपन्यांसोबत जे चीनची सफर करुन आले होते त्यांच्याकडे मी काय काय बघीतलं हे तपासून पहाण्याची एक मोठी यादीच होती. बहुतेकवेळा मी गप्पच होते.

पण तरीही चीनमधे मी पाहिलं खूप.