बखर - 2012

May 22nd

फ्रेंच ओपन टेनिस - २०१२

0

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २७ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविच आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल.
मार्डी फिश आणि सोडर्लिंग उर्फ सोड्या ह्यांनी ह्या स्पर्धेतून माघार घेतल आहे.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

मानांकनं तसेच ड्रॉ जाहिर झाले की इथे अपडेट करेन...

भोकराचे लोणचे

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो भोकरे
१ मध्यम आकाराची कैरी
२ चमचे लाल तिखट
३ चमचे मिठ
दिड चमचे मेथी
७-८ चमचे मोहरी पूड
३ चमचे हळद
१/२ छोटा चमचा हिंग
२ मोठ्या पळ्या तेल फोडणीसाठी

क्रमवार पाककृती: 

ही अशी आधी झाडावर लटकलेली कच्ची भोकरे काढून घ्या. हाहा

* भोकरे व कैरी स्वच्छ धुवून पुसुन घ्यावीत. आता कैरीच्या फोडी कराव्यात. भोकरांचे सुरीने कापून दोन भाग करा.

हे मला शिंपल्यातल्या मोत्यासारख वाटत आहे स्मित (कैच्याकै, मला काय वाटेल त्याचा भरवसा नाही हाहा)

* एका भागातली बी काढून टाका. हे खुप किचकट काम आहे. कारण बी इतकी चिकट असते. की आपली बोटे चिकट होतात. पण आपल्यामध्ये चिकाटी असू द्या. हाहा

आता हात धुवताना कसोटी असते. २-३ वेळा साबण लावून हात धुतल्यावर एकदाचा चिकटपणा जातो.
मसाला तयार करायला घ्या. १ चमचा तेलावर मेथी तळून घ्या. गार करा व मिक्सरमध्ये पुड करा. मस्त वास येतो. (ही खटपट करायची नसेल तर सरळ मेथी पूड आणा पण चवीत थोडा फरक पडतो.)

आता मोहरीची डाळ सोडून बाकीचे जिन्नस म्हणजे हळद, मिठ, मिरची पूड हिंग एकत्र करा.

फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा चांगले गरम झाले की गॅस बंद करून भांडे खाली उतरवा आणि मग त्यात मोहरीची डाळ टाका म्हणजे ती जळणार नाही.

ही फोडणी थंड होऊ द्या. एकत्र केलेला मसाला आणि फोडणी एकत्र करून घ्या.

हा मसाला फिडींमध्ये चांगला मिसळा.

एका काचेच्या बरणीत हे लोणचे भरून ठेवा. जास्त दिवस ठेवायचे असेल तर अजुन १-२ पळ्या तेल गरम करून फोडी बुडे पर्यंत बरणीत ओता म्हणजे बुरशी चढत नाही.

हेहे झाले लोणचे तयार ७-८ दिवसांनी मुरेल मग खायला घ्या.

वाढणी/प्रमाण: 
लोणच्याच्या बाबतीत सांगणे कठीण.
अधिक टिपा: 

कैरी नाही टाकली तरी चालते पण कैरी मुळे खार चांगला होतो.

फोडणी द्यायची पद्धत वेगवेगळीही असते. कुणी हिंग, मोहरी डाळ हळद व मेथीपुडही टाकतात फोडणीत.

मसाल्याचा खटाटोप करायचा नसेल तर रेडीमेड आणला तरी चालेल पण त्यात बनवलेल्या चवीची मजा नसते.

इतर लोणची :
पारंपारीक पद्धतीने आंब्याचे लोणचे - http://www.maayboli.com/node/25660
चिंचेच्या रसातील मिरचीचे लोणचे - http://www.maayboli.com/node/29204

माहितीचा स्रोत: 
पुस्तकी ज्ञान

मॅगपाई रॉबीन

काही दिवसांपूर्वी घरातून टिपलेला हा मॅगपाई रॉबीन.
================================================================================

उटीची ब्यूटी

आम्ही फ्रेब्रुवारीत उटीला गेलो होतो. फेब्रुवारीतही मस्त थंडी होती. तिथले काही फोटो.
मॉर्निंग वॉक...

DSCN1322_0.JPG

जागोजागी दिसणारे हिरवे गार चहाचे मळे

DSCN1324_0.JPG

हॉटेल रूम मधून दिसणारे दृश्य.

DSCN1325_0.JPG

किल्ले अर्नाळा

0

महाराष्ट्र दिनाची सुट्टी कशी सत्कारणी लावायची या विचारात असताना 'योरॉक्स'चा समस आला. विरारचा जलदुर्ग 'अर्नाळा' करण्याचा बेत होता. मस्त 'बुजिंग ट्रेक'चा प्लॅन ठरला. रामप्रहरी संयोजक टांगांरू असल्याची वर्दी समस मधुन मिळाली... पण मोहिम रद्द न करता गिरिविहारच्या रथातून आगाशीच्या दिशेने निघालो.

पुन्हा गवसलो होतो

खरे सांगतो माझ्यापासुन मीच हरवलो होतो
डोळ्यामध्ये तुझ्या पाहता पुन्हा गवसलो होतो

आस तुझी सोडून दिली मी सर्व संपले होते
वळून तू बघता जातांना मी मोहरलो होतो

आज अचानक कबरीवरती दिवा लावला तू अन्
प्रेम कळाले मरणानंतर तरी बहरलो होतो

एक कवडसा जगण्यासाठी मला पुरेसा होता
तो मावळता अंधारी मी मुकाट निजलो होतो

असंख्य कोल्हे, नभी गिधाडे, आप्त भोवती असता
जगणार्‍याने कसे जगावे? मी गांगरलो होतो

देव म्हणे "कैदेत राहिलो धूर्त पुजार्‍यांच्या,
सोडुन गेलो मंदिर जेथे मी गुदमरलो होतो"

किती फाटका प्रपंच माझा! लोक सुदामा म्हणती
कधी न झाली कृष्णकृपा, पण मी सावरलो होतो

मन मांडते खेळ ……

मन मांडते खेळ, त्यात त्याचेच नियम!
हरते कधी चुकुन, पण जिंकते कायम!
मनच रुसते, मनच मनवते!
मनाच्या वेडेपणाला, मनच हसते
मन करते तक्रार, मनच फिर्यादी!
चुक नाही माझी, पण मीच आरोपी!
मनच समजावते, तेच न्याय करते!
आनंदी राहण्याची शिक्षा सुनावते!
मन कधी रडते, आसुही तेच पुसते!
हसऱ्या गालावर, दुखाःची खळी पडते!
मन स्वच्छंदी, मन लहरी!
मन मिणमिणणारी पणती!
मन सुरेल, मन सुरेख!
मन झरझर वाहणारी नदी!
मन दिसते कसे? मन असते कसे?
हे नेहमीच बिचारे फसते कसे?
मनाच्या प्रश्नांना, द्यावे उत्तर मनानेच!
उलगडा होऊपर्यत, जगावे मुक्त मनाने!

mukti.

वळीव

उन्हाळा आणि विरह यातलं नेमकं साम्य काय?
उन्हाळ्यानंतर वळीव अंगणात बरसताना दिसतो
आणि याच वर्षावात चिंब झालेला
सजण दारी उभा असतो ! ! !...........

वाघाची शिकार रोखण्यासाठी जालीम उपाय.

0

tigers.jpeg
प्रकाशचित्र सौजन्य:- आंतरजाल

देशभरात ' वाघ वाचवा ' मोहीम जोरात असतानाच गेल्या बारा वर्षांत सुमारे साडेचारशे वाघ वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे . त्यातील बहुतांश वाघ शिकारीमुळे मरण पावल्याची माहिती पर्यावरण व वन मंत्रालयाने दिली आहे . वाघ हा डौलदार, शक्तिमान सुंदर प्राणी आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केला; परंतु हाचा वाघ आज आपल्या अस्तित्वासाठी सरकारकडून आणि लोकांकडून स्वतःच्या जीविताच्या रक्षणाची प्रतीक्षा करीत आहे.

गुलमोहर

गुलमोहराच्या पाकळ्यांनी सजलेल्या पायवाटेवरून पुढे गेलं की तुझं घर येतं,
तीव्र उन्हाळे भोगलेलं माझं मन मग तिथे अलगद विसावतं........